Share Now
Read Time:1 Minute, 7 Second
कोल्हापूर : उद्योग मंत्री उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार, दि. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने श्री क्षेत्र सिध्दगिरी कणेरी मठकडे प्रयाण. सकाळी १०.१५ वाजता श्री क्षेत्र सिध्दगिरी महासंस्थान, कणेरी मठ, कोल्हापूर या संस्थेच्या वतीने आयोजित सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रमानिमित्त विशेष परिषद, परिसंवाद कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: श्री क्षेत्र सिध्दगिरी मठ) दुपारी १२.१५ वाजता कणेरी मठ येथून विमानतळकडे प्रयाण. दुपारी १२.३० वाजता विमानतळ येथे आगमन व विमानाने रत्नागिरीकडे प्रयाण.
Share Now