Share Now
Read Time:1 Minute, 5 Second
कसबा पेठ : कसबा पोटनिवडणूक भाजपला मोठा धक्का देत काँग्रेसचे रविंद्र धंगेकर ११०४० मतांनी हेमंत रासने यांचा पराभव करून विजयी गुलाल उधळला. रविंद्र धंगेकर यांना एकून ७३२९४ मते मिळाली तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना ६२२४४ मते मिळाली.शिवसेना नाव धनुष्यबाण आणि सत्ता संघर्ष या सर्व राजकीय घडामोडीनंतर ही पहिलीच निवडणूक होती यामध्ये महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी २८ वर्षे भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा पेठ मध्ये हेमंत रासने यांचा १००४० मतांनी पराभव केला. या पराभवाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. या निकालाचा पुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये खुप मोठा परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Share Now