युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या तर्फे इको फ्रेंडली रंगपंचमी उत्साहात साजरी…!

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 23 Second

कोल्हापुर : युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आज पर्यावरण पूरक इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी “पाणी वाचवा देश वाचवा” अशा घोषणा देत आज कोल्हापूर मुख्य कार्यालय येथे रंगपंचमी साजरी केली. 

या वेळी माजी नगरसेवक ईश्वर परमार आणि बी न्यूज चे मुख्य बातमीदार प्रमोद व्हनगुत्ते यांच्या प्रमूख उपस्थिती मध्ये या कार्यक्रमास सुरुवात झाली.

  युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी बोलताना ते म्हणाले रंगपंचमी उत्सव साजरा करत असताना पाण्याचे महत्व किती आहे याबद्दल सांगितले दिशादर्शक पलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.दिशादर्शक फलकवर

 पाण्याविना नाही प्राण,

 पाण्याचे तू महत्त्व जाण…

 थोडे सहकार्य थोडी नियोजन,

 पाणी फुलवे आपले जीवन!

 पाण्याचे महत्व संदर्भात वाक्य लिहिण्यात आले होते यावेळी पत्रकारांचे मित्र माजी नगरसेवक ईश्वर परमार यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना कोल्हापूर जिल्हा हे पुरोग्रामी जिल्हा असून राजर्षि शाहू महाराजांनी आपल्यासाठी भविष्यातील शंभर वर्षे पाण्याची कमतरता बासणार नाही याची दूरदृष्टी लक्षात घेऊन त्याकाळी नियोजन करून ठेवले आहे म्हणून कोल्हापूर वासियांना पाणी कधी कमी पडणार नाही तरीही अनेक जिल्ह्यात विदर्भात पाण्याची कमतरता भासते. आपल्याकडे मुबलक पाणी असले तरीही काटेकोर नियोजन करून जपून वापरले पाहिजे.युवा पत्रकार संघाने घेतलेला इको फ्रेंडली रंग पंचमी उत्सव कौतुकास्पद आणि प्रबोधनात्मक आहे. असे कार्यक्रम पुढील काळामध्ये ग्रामीण भागातही राबवले पाहिजे असे मत व्यक्त करून सर्व पत्रकार बंधू भगिनींना व उपस्थित यांना शुभेच्छा दिल्या  

  बी न्यूज चे मुख्य बातमीदार प्रमोद व्हनगुत्ते यांनी युवा पत्रकार संघाचे कार्य खरोखरच चांगले असून गेल्या काही वर्षापासून श्रमिक पत्रकांसाठी विविध उपक्रम राबवून पत्रकारांच्या हितासाठी लढत आहे पुढील काळामध्ये माझ्याकडून कोणती मदत लागली तर मी करणार असून जल है तो कल है असे बोलून शुभेच्छा दिल्या.शेवटी युवा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शरद माळी यांनी सर्वांचे आभार मानले.

या वेळी युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे, राज्य कार्याध्यक्ष रतन हुलस्वार,प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव वळवडे, राज्य उपाध्यक्ष जावेद देवडी, कोकण विभागीय उपाध्यक्ष अमोल पोतदार, राज्य सरचिटणीस अजय शिंगे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शरद माळी,पत्रकार रविराज कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष जितेंद्र कळंत्रे, करवीर तालुका अध्यक्ष अझरुद्दीन मुल्ला, संघाचे पदाधिकारी नियाज जमादार, प्रगतधाराचेे संपादक पंडितराज कर्णिक, प्रदीप चव्हाण, आणि पत्रकार संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *