Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर – विचार बदलला तर अस्तित्व बदलेल, असे प्रतिपादन जीजेसी अध्यक्ष संयम मेहरा यांनी आज येथे केले.ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलच्या (जीजेसी) वतीने येथील महाराजा बँक्वेट हॉल येथे सराफ व्यावसायिकांसाठी लाभम कार्यशाळा झाली. त्यामध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, पारंपरिक चालणाऱ्या आपल्या व्यवसायातील बदलासाठी आपला विचार प्रथम बदल केला तर त्यानुसार व्यवसायात सकारात्मक बदल होतील.
उपाध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले, आपण संगठित नसल्यानेच सरकारच्या वतीने पारंपरिक, पिढ्यान पिढ्या विश्वासावर चालणाऱ्या या व्यवसायावर निर्बंध आणले जात आहे. आपण संगठित होऊन याविरुद्ध लढा देऊया. जीजेसीचे माजी उपाध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी सांगितले की, आपले असंगठित क्षेत्र असूनही देशाच्या जीडीपीमध्ये ७-८ टक्के वाटा आहे. १५ टक्के निर्यात होते. १ कोटी रोजगाराची निर्मिती होते, तर पाच कोटी या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या घटकांची संख्या आहे. जिंदगी के साथ और जिंदगी के बाद अशा सोने या घटकाचा वापर २०० देशांमध्ये होतो. दृष्टिकोन बदलला तर ग्राहकांचा आपल्या व्यवसायावर आणखी विश्वास वाढेल.
चार्टर्ड अकौंटंट चेतन ओसवाल यांनी जीएसटी व एचयूआयडीविषयी विस्ताराने मार्गदर्शन केले. त्यांनी सभासदांच्या शंकांचे समाधानही केले.कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी प्रास्ताविकात लाभम कार्यशाळा घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांचेही मार्गदर्शन झाले.
प्रल्हाद पाटील, लाभमचे निमंत्रक साहील मेहरा यांनी सूत्रसंचालन केले. कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे सचिव माणिक जैन यांनी आभार मानले.
यावेळी दिलीप लागू, शहरचे उपाध्यक्ष विजय हावळ, जिल्हा उपाध्यक्ष दिनकर ससे, दीपक वेर्णेकर, तेजस धडाम, संजय पाटील, तेजपाल शहा, गजानन बिल्ले, जितेंद्र राठोड, विजयकुमार भोसले, सुहास जाधव, संजय खद्रे, राजू चोपडे, तुकाराम माने, शशिकांत मांगले, प्रतीक तिवारी यांच्यासह जिल्ह्यासह बाहेरूनही मोठ्या संख्येने सराफ व सुवर्णकार उपस्थित होते.
एचयूआयडी आणि चेतन ओसवाल
येत्या १ एप्रिल २००३ पासून सहा अंकी एचयूआयडी केंद्र शासनाने सक्तीचा केला आहे. त्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी चार्टर्ड अकौंटंट चेतन ओसवाल दुपारी दोन वाजता बोलायला लागले. सलग दीड तास त्यांनी मार्गदर्शन केले. जेवणाची वेळ असूनही सभागृह पूर्ण भरले होते. जागचे कोणीही हलले नाही. यावरून सराफ व्यावसायिकांत एचयूआयडीविषयी उत्सुकता दिसून आली.