Share Now
Read Time:1 Minute, 17 Second
कोल्हापूर: राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुक प्रक्रिये मध्ये सतेज पाटील गटाचे २९ उमेदवार अपात्र ठरविण्यात आले. यामुळे निवडणुकीला वेगळे वळण आले आहे. या निर्णयानंतर आ. सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सभासदांशी बोलताना आ. सतेज पाटील म्हणाले कोणताही गट बिनविरोध होणार नाही २९ उमेदवार अपात्र ठरविण्याच्या निर्णयाला हाय कोर्टात आव्हान देणार आपण थांबायचे नाही.. आपल ठरलंय कंडका पाडायचा ! चांगला कारभार केला तर रडीचा डाव का खेळता ?? कुस्ती करायची होती मग पळपुटेपणा का करता ?पत्ता कसलाही असुदे .. तुम्ही जोकर टाकलाय पण १२ हजार सभासद हा एक्का माझ्याकडे आहे.ही लढाई महाडिक आणि बंटी पाटील अशी नाही.. तर कोल्हापूरचे १२ हजार सभासद विरुद्ध येलूरचे ६०० सभासद अशी आहे ही निवडणूक काहीही झाले तरी जिंकायची आहे.
Share Now