दिपक भगत-प्रतिनीधी
रायगड :-गेली कित्येक वर्षे आंबेवाडी-निवी या विभागातील कालवा पाणी प्रश्न प्रलंबित होता.कालव्याला पाणी नसल्याकारणाने कित्येक एकर जमीनीला नापिकीचा फटका बसला.अनेक शेतकर्यांनी नापिकिला कंटाळून कवडीमोल भावाने जमिनी विकून टाकल्या.पाण्याची भुजल पातळी कमी झाली यातुन पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत होती.कालव्याला पाणी कधी येणार? अशीच प्रश्नार्थक कुजबूज या विभागातील नागरिकांची होती.पण प्रत्यक्ष पुढाकार घेणार कोण?हा शिवधनुष्य पेलणारे कोण? कारण हा विषय तेवढा सोपा नव्हता.या विचारात समस्त नागरिक असतानाच मागील वर्षी”कालवा समन्वय समितीचा” जन्म झाला.राजेंद्र जाधव व त्यांच्या सहकार्यानी आंबेवाडी-निवी विभागात जनजागृती करुन सर्व शेतकरी,तरुण,ग्रामस्थ यांना एकत्र करुन “कालव्याला पाणी सोडा” या मागणीसाठी निवेदन दिल,प्रसंगी आमरण उपोषणाचा बडगा उभारला.अनेक संघर्षाला सामोर जात असताना त्यांच्या संघर्षाला अखेर यश मिळाल.गेली पंधरा-वीस वर्षे बंद असलेल्या कालवा प्रकल्पाच्या दुरुस्तीला संजीवनी मिळाली.सुरुवातीचे अडथले पार करीत करीत काम अखेर जोरात चालु झाल.पण विकास कामांना अडथळा निर्माण करणार्या समाजकंटकांची समाजात काहि कमी नसते.या विकृत वृतीमुळे विकासकामांना खीळ बसतो एवढ मात्र नक्की…!
आज घडीला आंबेवाडी-निवी कालवा दुरूस्तीच काम प्रगतीपथावर असुन हे काम ७०% हुन अधिक प्रमाणात झालेल आहे.पण या कामात टक्केवारीची अपेक्षा ठेवणार्यां स्थानिक ठेकेदाराच्या “लालसेची माशी अखेर शिंकलीच” अाणि तिसे येथे चालु असलेल सायपनच काम थांबल.तुमचा शेठ मला भेटल्याशिवाय मी काम करु देणार नाही? तुमच्या ठेकेदाराला मला भेटायला सांगा..!अशी धमकिवजा सुचना संबधित अधिकृत ठेकेदाराला काम करणार्या माणसाकरवी दिली.त्यामुळे घाबरलेल्या ठेकेदारांनी काम थांबवुन हि घटना “कालवा समन्वय समितीला” सांगितली.कालवा विकास कामात टक्केवारी मागणारा हा बहाद्दर ठेकेदार नेमका आहे तरी कोण..?अशी जोरदार चर्चा विभागासह रायगड जिल्ह्यात ऐकावयास मिळते आहे.परंतु अशा उद्भवलेल्या परिस्थितीचा बीमोड कसा करायचा याचा बाळकडु कोलुन प्यायलेल्या “कालवा समन्वय समितीने” तात्काळ अॅक्शन मोडमध्ये जात काम थांबवणार्या ठेकेदाराच्या विरोधात आक्रमक झाल्याच पहावयास मिळाल.त्यानंतर तहसिलदार रोहा आणि कोलाड पोलिस स्टेशन यांची भेट घेवुन संपुर्ण घटनेच वृत्त संबधित विभागास सांगितल.”जर हे काम पुन्हा थांबल..! स्विकृत ठेकेदाराला कोणी धमकि देवून काहि भलत सलत करण्याचा प्रयत्न केला तर..! कालवा समन्वय समिती त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर देईल”.अडवणूक करणार्या ठेकेदाराला जर काहि कमिशन हव असेल तर त्याची भुक त्यांनी ईतर ठिकाणी भागवावी उगीच त्यांनी कालव्याच्या कामाला अडवणूक करु नये.अशी संतप्त प्रक्रिया नागरिकांनी दिली आहे.
यावेळी तहसिलदार किशोर देशमुख तसेच कोलाड पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरिक्षक अजित साबळे यांना कालवा समन्वय समितीच्यावतीने चर्चा करुन निवेदन देण्यत अाले.यावेळि उपस्थित कालवा समन्वय समितीचे राजेंद्र जाधव,विठ्ठल मोरे,तुकाराम भगत,संतोष शिर्के,चंद्रकांत बामुगडे,गोविंद कळंबे,प्रशांत राऊत,महेश कांबळे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.