कोल्हापूर : शिवसेनेचे मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर असून त्यांनी अयोध्येतील राम मंदिरात दाखल होत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शरयू नदी काठी आरती सोहळ्यासह विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. या आरतीचे थेट प्रक्षेपण शिवसेनेच्यावतीने कोल्हापुरात करण्यात आले. शिवाजी पेठेतील निवृत्ती चौक येथे मोठ्या एल.ई.डी. स्क्रीन द्वारे या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. असंख्य शिवसैनिक आणि शहरवासियांनी या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहिले. यावेळी शिवसैनिकांनी “प्रभू श्रीरामचंद्र कि जय”, “जय भवानी, जय शिवाजी” अशा घोषणांनी परिसर दणाणूण सोडला.
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, दक्षिण शहरप्रमुख महेंद्र घाटगे, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उदय भोसले, किशोर घाटगे, शहर समन्व्यक सुनील जाधव, युवासेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, योगेश चौगले, सचिन राऊत, कपिल सरनाईक, सुरज साळोखे, सुरेश माने, शैलेश साळोखे, निलेश हंकारे, राजू काझी, सम्राट यादव, कपिल नाळे, मंदार तपकिरे, सचिन पाटील, श्रीकांत मंडलिक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.