कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सभा होत आहे. तसेच सभासदांच्या भेटी देखील होत आहेत सभासदांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहता त्यांचा पाठींबा सहकार जपणाऱ्या हक्काच्या सत्तारूढ आघाडीला आहे, हे स्पष्ट दिसते आहे. असे मत चिखली येथे पार पडलेल्या सभेत खा. धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की सभासद आघाडीवर दाखवत असलेला विश्वासच खर्या अर्थाने आमची अर्धी लढाई जिंकून देत आहे. राजारामने आतापर्यंत सहकाराची कास धरूनच आपली वाटचाल केली आहे आणि इथून पुढेही करत राहतील, हे आपण विरोधकांना दाखवून देऊ. या निवडणुकीत ‘कपबशी’ चिन्हावर शिक्का मारून आपल्या ‘छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडी’ला निवडून द्या, असे देखील आवाहन सर्व सभासद बांधवांना केले.
यावेळी जयंत पाटील सर, नंदकुमार मोरे, रामचंद्र गुरव, संभाजी पाटील (नाना), बाजीराव पाटील, हंबीरराव पाटील (करवीर, तालुकाध्यक्ष), रोहित पाटील (सरपंच), अभिजीत पाटील, रघुनाथ पाटील, केवल रजपूत आणि सभासद उपस्थित होते….