धक्कादायक: सीपीआर मध्ये आढळली मृत अर्भके

Ajay Shinge 

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील सी पी आर रुग्णालयाच्या आवारात आज सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी सीपीआर परीसरात कचरा कोंडाळ्यात २ मृत अर्भके आढळ्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सीपीआर परिसरातील फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी ही अभ्रके येथे आणली असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. सी पी आर च्या पाठीमागील भिंती जवळ एक मोठा कचरा कोंडाळा आहे. मागील बाजूने अज्ञात व्यक्तींनी ही अर्भके कोंडाळ्यात टाकली असावीत असा संशय व्यक्त केला जातो आहे. 

Advertisements

 घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लक्ष्मीपुरी पोलिस पोहचले असून नक्की काय प्रकरण आहे याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. मात्र आज सकाळी उघडकीस आलेल्या या प्रकाराने हॉस्पिटल मध्ये एकच खळबळ उडाली आहे. अशा घटनेमुळे सी पी आर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.सध्या ही दोन्ही अर्भके शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आली आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध होत नाही. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे योग्य ती माहिती लवकरच समोर येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *