Share Now
कोल्हापूर : एव्हरशाईन इंग्लिश स्कूलने स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात, कोल्हापूर जिल्ह्यात व करवीर तालुक्यात उत्तुंग भरारी घेतली आहे.
महाराष्ट्र राज्यातून ८ लाख ४५ विद्यार्थी नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थिनी साईषा तुषार राऊत हिने २०० पैकी १५६ गुण मिळवत कोल्हापूर जिल्ह्यात तिने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
शाळेतून ५५ विदयार्थी या परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी २३ विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.१९ विद्यार्थ्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे तर ४ विद्यार्थ्यांनी करवीर तालुक्यातील गुणवत्ता यादीत यश प्राप्त केले आहे.
साईषा राऊत हिला या परीक्षेसाठी तिला शाळेतील संस्थापिका संचालक मंडळ मुख्याध्यापक शिक्षक व आई वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले..
Share Now