मुद्रित शोधकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध – डॉ रामचंद्र जी पवार

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 15 Second

आकाश माडगूळकर

 कोल्हापूर :-‘ समाजामध्ये आज ग्रंथ, नियतकालिके, वृत्तपत्रे व इतर छापील साहित्य मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होत आहे . अशा साहित्याचे निर्दोष मुद्रितशोधन करणाऱ्या तज्ज्ञांची खूप कमतरता आहे . चांगले मुद्रितशोधक मिळत नाहीत .त्यामुळे मुद्रित शोधण्याच्या क्षेत्रात स्वयंरोजगाराची मोठी संधी उपलब्ध आहे .नाइट कॉलेजने मुद्रितशोधन प्रमाणपत्र कोर्स घेऊन विद्यार्थ्यांना भाषिक प्रगल्भतेबरोबरच करिअरचे मोठे दालन उपलब्ध करून दिले आहे . ‘ असे मत शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ .आर जी पवार यांनी व्यक्त केले .

          नाईट कॉलेजच्या मराठी विभागाच्या वतीने मुद्रितशोधन प्रमाणपत्र अभ्यासक्रम कोर्स घेण्यात आला . या कोर्सच्या सांगता समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ . आर जी पवार हे बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र .प्राचार्य डॉ. एस जे फराकटे होते .

          डॉ पवार यांनी पुढे बोलताना आजीवन अध्ययन विभागाच्या विविध कोर्सेसची माहिती दिली . विद्यार्थ्यांनी आयुष्यभर निरंतर शिक्षण घेत राहावे .ज्ञान हीच शक्ती आहे .ज्ञान आणि कौशल्य असणारी व्यक्ती आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटू शकते .म्हणून अखंड अध्ययन करीत रहा, असा सल्ला त्यांनी दिला . प्रभारी प्राचार्य एस जे फराकटे यांनी नाइट कॉलेजमधील विविध उपक्रमांची माहिती दिली.

           मराठी विभाग प्रमुख डॉ .अरुण शिंदे यांनी प्रास्ताविकामध्ये कोर्सचा उद्देश, त्यास मिळालेला प्रतिसाद व कोर्सचे महत्त्व विशद केले . प्राचार्य श्रीधर हेरवाडे व बाजीराव जठार यांनी कोर्सला अध्यापन केले . जठार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले . याप्रसंगी डॉ प्रशांत गायकवाड ,अमित मेधावी , भरत कुंभार , साताप्पा माळी आदींनी मनोगते व्यक्त केली . मुद्रितशोधनाच्या कोर्समुळे आपले मराठी लेखनविषयक नियम व व्याकरण परिपूर्ण झाले व त्याचा आपल्या व्यावहारिक जीवनात उपयोग होईल असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले. आभार प्रदर्शन विजय कांबळे यांनी केले .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *