Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजर्षी शाहू गोल्ड कप स्पर्धा शाहु स्टेडियम येथे सुरु आहेत. आजचा उपांत्यपूर्व सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुध्द केएसईबी केरला यांच्यात खेळला गेला. हा सामना केरला संघाने ४-० गोल फरकाने जिंकला. संपूर्ण वेळेत सामन्यावर केरला संघाचे वर्चस्व राहिले. सामन्यात पाटाकडील तालीम मंडळाकडून ओंकार मोरे, सोमाडी, रोहित देसाई साैरभ सालपे, ऋषिकेश मेथे – पाटील यांनी पूर्वार्धात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. केरला संघानं मात्र शाॉर्ट पासच्या बळावर पाटाकडील संघाला गोल क्षेत्रात खेळतं ठेवलं. ऋषिकेश मेथे – पाटील याला चालून आलेल्या गोलच्या दोन सोप्या संध्या वाया गेल्या. सामन्याच्या ४२ व्या मिनिटाला शार्ट पासच्या जोरावर केरलाच्या करुण बेबी यानं मैदानी गोल करुन १ -० अशी आघाडी मिळवत पाटाकडील समोर आव्हान उभा केलं. उत्तरर्धात गोलची बरोबरी साध्यासाठी पाटाकडील खोलवर चढाया झाल्या.पाटाकडीलच्या ओंकार मोरेनं केरलाच्या छोट्या डी मध्ये दिलेल्या पासवर ऋषिकेश मेथे – पाटीलनं मारलेला चेंडू गोल पोस्टवरुण गेल्यानं पाटाकडीलची गोलची सोपी संधी वाया गेली. त्या पाठोपाठ पुन्हा सौरभ सालपे दिलेल्या पासवर ऋषिकेशने गोलची दुसरी सोपी संधी गमावली.शांत आणि संयम खेळ करत केरलाच्या करुण बेबीनं दिलेल्या अचूक पासवर पासावर विक्नेश एमनं ४८ व्या मिनिटालाच संघासाठी दुसरा गोल करुण २ -० अशी आघाडी घेतली. सामन्याच्या ६४ आणि ६८ व्या मिनिटाला विक्नेश एम नं गोल करुण ४ -० अशी भक्कम आघाडीच्या बळावर केरला संघानं हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.