कोल्हापूर : माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घटनात्मक पदावर कार्यरत असताना पक्षपातीपणा करून राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यात केंद्र सरकारला मदत केली.सत्ता संघर्ष च्या निकालावेळी राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय चुकीचे असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले.त्यानुसार कोष्यारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक झाला. पितळी गणपती चौक ते विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या कार्यालयावर ठाकरे गटाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी कोषारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
“चले जाव चले जाव कोशियारी चले जाव, घटनात्मक सरकार पाडणाऱ्या कोशियारी यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, पदाचा गैरवापर करणाऱ्या कोशियारींचा धिक्कार असो,” अशा घोषणा देण्यात आल्या.मागणीचे निवेदन पोलीस अधिकारी तानाजी सावंत आणि शहर डी वाय एस पी मंगेश चव्हाण यांना देण्यात आले.
दरम्यान कोशारी यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर न्यायलयात जाऊ असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, युवा सेनेचे मंजित माने,महिला आघाडीच्या शुभांगी साळोखे,दीपा शिंदे,प्रीती क्षीरसागर, यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.