कोल्हापूर : शाहू छत्रपती महाराज यांच्या ७५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरू असलेल्या शाहु गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील १८ तारखेला होणा-या अंतिम सामन्याला एआयएफएफचे जनरल सेक्रेटरी डॉ. शजी प्रभाकरन आणि भारतीय फुटबाॉल संघाचे माजी कर्णधार के. विजयन हे उपस्थित राहणार आहेत. त्यांचा युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते सत्कार केला जाणार असल्याची माहिती केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत दिली. सामन्याच्या मध्यांतराला डॉ. शाजी प्रभाकरण यांच्या हस्ते शाहू छत्रपती महाराज यांचा मानपत्र देवून नागरी सत्कार केला जाणार आहे. स्पर्धेच्या अंतिम दिवशी केरळाचा सूप्रसिध्द चेंडा वाद्यवृंद ब्रो हाऊस सादर केलं जाणार आहे. त्यासह कोल्हापूरात पहिल्यांदाच एक वेगळी अशी भव्य अतषबाजी केली जाणार असल्याची माहिती देेेेखील मालोजीराजे यांनी दिली.त्याच बरोबर कोल्हापूरातील एसएमपीएस हॉस्पीटल तर्फे कोल्हापूर मधील १६ संघामधील खेळाडूंच्या १ वर्षासाठी मोफत तपासण्या केल्या जाणार आहे. त्यासाठी १६ संघातील सर्व खेळाडूंना हाॉस्पिटलकडून हेल्थकार्ड देवून देण्यात आले. त्याच वितरण वितरण मालोजराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले.
शाहू गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार अविस्मणीय : मालोजीराजे छत्रपती

Read Time:1 Minute, 56 Second