डिजिटलसह इलेक्ट्रॉनिक्स व रेडिओ क्षेत्र “श्रमिक पत्रकार” कक्षेत घेण्याचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय
एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार: युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य

मुंबई , दि.३०- सहा महिन्यांपूर्वी भिलार-महाबळेश्वर येथे झालेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या पहिल्या ऐतिहासिक अधिवेशनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील डिजिटल मिडिया पत्रकारांना दिलेला शब्द आज खरा करुन दाखविला.

डिजिटल मिडियासह इलेक्ट्रॉनिक्स माध्यम अस्थापनांना “श्रमिक पत्रकार” कक्षेत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

Advertisements

नोंदणीकृत युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी तुकाराम शिंगे यांनी राज्यातील  श्रमिक पत्रकारांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.

भिलार महाबळेश्वर येथे झालेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या  महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन भाषण करुन उद्घाटन केले होते. डिजिटल मिडिया क्षेत्राचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाद्वारे दिला होता.

अधिवेशनामधील मागण्या-

डिजिटल मिडियाला पत्रकारिता माध्यम म्हणून मान्यता देवून सरकार दरबारी नोंदणी व्हावी, मुद्रित माध्यमांप्रमाणे डिजिटल मिडिया ला नियमित जाहिराती मिळाव्यात, डिजिटल पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका दिल्या जाव्यात यासह सोळा मागण्या करणारे ठराव अधिवेशनात करण्यात आले.

त्या अधिवेशनात एकजुटी श्रमिक पत्रकार म्हणून जाहीर पाठिंबा देऊन कोल्हापूर “युवा पत्रकार संघ” कोल्हापूर व  राज्यातील अनेक पत्रकार संघटनाचे पदाधिकारी सहभागी झाले होते,

पाहुणे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, सांसदीय कार्यमंत्री  चंद्रकांतदादा पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, राजे नियोजन कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष मा. राजेश क्षीरसागर यांचा सक्रीय सहभाग होता. राज्यातील सुमारे दोन हजार श्रमिक पत्रकारांच्या उपस्थित पार पडलेल्या अधिवेशनात मांडलेले सर्व प्रश्न मार्गी लागण्याची प्रक्रिया आज मंत्रिमंडळाच्या निर्णयाद्वारे सुरु झाली आहे.

युवा पत्रकार संघाचे राज्यातील सर्व पदाधिकारी, सदस्य

संस्थापक अध्यक्ष: शिवाजी शिंगे युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचा वतीने  एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *