Share Now
Read Time:3 Minute, 55 Second
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
लोकसेवक श्री विजय आनंदराव पवार, वय ५० वर्ष व्यवसाय फायरमन प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी सांगली, मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सांगली यांना १,२०,०००/- रुपये लाच स्विकारले नंतर रंगेहात पकडले सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई,

तक्रारदार परिया कंपनीमार्फत फायर फायटिंग सिस्टीम बसविल्याचा अंतिम कामाचा दाखला दिल्याचा मोबदला म्हणून १,५०,०००/- रु मागणी लोकसेवक विजय पवार यांनी केली होती. तक्रारदार यांनी १,५०,०००/- नाही दिले तर तक्रारदार यांचे कंपनी मार्फत करण्यात येणा-या पुढील फायर फायटिंग सिस्टीमचे अंतिम दाखल्याची कामे करणार नाही असे लोकसेवक विजय पवार यांनी तक्रारदार यांना सांगितलेने तक्रारदार यांनी त्यांचेकडे १,५०,०००/- रूपये लाच मागणी केली असल्या बाबतया तक्रारी अर्ज दि. १५.०६.२०२३ रोजी अन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक १५.०६.२०२३ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाण पडताळणी केली असता त्यामध्ये लोकसेवक विजय आनंदराव पवार यांनी तक्रारदार फायर फायटिंग सिस्टीम बसविल्याचा कामाचा अंतिम दाखला दिल्याच्या मोबदला म्हणून १,५०,०००/- रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती १,२७,०००/- रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर दि. २७.०६.२०२३ रोजी अग्नीशमन व आणीबाणी सेवा विभाग, गुरुव्दार जवळ टिंबर एरिया सांगली या कार्यालय मध्ये सापळा लावला असता लोकसेवक विजय आनंदराव पवार यांनी तक्रारदार यांचकड लाचेची मागणी करून १,२५,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने लोकसेवक श्री. विजय आनंदराव पवार, वय ५० वर्ष, व्यवसाय (फायरमन) प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी सांगली, मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सांगली वर्ग-३ रा. जोशी प्लॉट संभाजीनगर, त्रिमुर्ती कॉलनी सांगली. याचविरुध्द विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई अमोल तांबे पोलीस उप आयुक्त श्रीमती शितल जानवे, अपर पोलीस उप आयुक्त/ अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली . संदीप पाटील, पोलीस उप अधीक्षक, विनायक भिलारे, श्री. दत्तात्रय पुजारी पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार अजित पाटील, सलिम मकानदार, प्रितम चौगुले, ऋषीकेश बडणीकर, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, उमेश जाधव, अतृत्त्व मोरे, रविंद्र धुमाळ, सिमा माने चालक वंटमुरे यांनी केली.
Happy
0
0 %
Sad
0
0 %
Excited
0
0 %
Sleepy
0
0 %
Angry
0
0 %
Surprise
0
0 %
Share Now