टाकाऊ संगणकीय साहित्यापासून नवी मुंबईच्या आकर्षक नकाशाची थ्री आर अंतर्गत निर्मिती

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 1 Second

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

पुर्वेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि पश्चिमेकडील खाडीकिनारा यामध्ये वसलेले नवी मुंबई शहर सुनियोजित बांधणीचे आधुनिक शहर म्हणून नावाजले जाते. 109.59 चौ.कि.मी. क्षेत्रात विस्तारलेली नवी मुंबई दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, वाशी, नेरुळ, बेलापूर अशा 8 विभागांत सामावलेली आहे. अशा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचे विहंगम दर्शन घडविणारा नकाशा नुकताच महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या दालनात प्रदर्शित करण्यात आला असून या नकाशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची निर्मिती टाकाऊ संगणकीय साहित्यापासून करण्यात आलेली आहे.

यापूर्वी महापालिका मुख्यालयात घनकचरा व्यवस्थापन विभागात लावण्यात आलेल्या संगणकीय टाकाऊ साहित्यापासून तयार केलेल्या मदर इंडिया बोर्ड स्वरुपातील भारताच्या नकाशा ची विक्रमी नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये राष्ट्रीय पातळीवर झालेली असून अशाच प्रकारचा नकाशा कोपरखैरणे येथील स्वच्छता पार्कमध्ये लावण्यात आलेला आहे. हे नकाशे संगणकातील अथवा लॅपटॉपमधील विविध टाकाऊ साहित्यापासून बनविण्यात आलेले आहेत.

याच धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा 5 फूट उंचीचा नादुरूस्त संगणक व लॅपटॉपधील मदरबोर्ड व इतर साहित्यापासून तयार केलेला नकाशा महापालिका मुख्यालयातील आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या दालनात प्रदर्शित करण्यात आला आहे. 23 निरुपयोगी लॅपटॉप, संगणकातील सर्कीट बोर्ड, कन्डेन्सर बॅटरी व वायर्स यांचा वापर करून बनविलेला हा नवी मुंबईचा नकाशा त्याच्या आगळ्या वेगळ्या स्वरुपामुळे पटकन लक्ष वेधून घेतो. 

 नवी मुंबईतील वेस्ट टू बेस्ट आर्टीस्ट श्री. किशोर बिश्वास यांनी आपल्या सहका-यांसह मदर इंडिया बोर्ड नकाशासारखाच हा नवी मुंबईचा नकाशाही टाकाऊ वस्तूंपासून बनविलेला असून त्यामुळे आयुक्त दालनाची शोभा वाढली आहे.

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *