Share Now
Read Time:1 Minute, 20 Second
मुंबई: सध्या राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ होत आहेत. आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात तर अनेक घडामोडी या होत असल्याचं दिसत आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. अजित पवार यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावेळी अजित पवार म्हणाले आहेत की, “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक पार पाडीन.”
ष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी दिनांक २ जुलै मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजभवनात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली . दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही महाराष्ट्राच्या मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शपथविधीवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राजभवनात उपस्थित होते
Share Now