Share Now
मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. राष्ट्रवादी पक्षात सध्या जोरदार हालचाली सुरु असल्याचं समोर आले आहे.
अजित पवार यांच्या बंगल्यावर आमदार, खासदार यांची बैठक ही बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर राज्याच्या राजकाणार मोठा भुकंप होणार असल्याची चित्र सध्या समोर आले आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.
आज एकीकडे अनिल देशमुख यांनी पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर दिनांक ६ जुलै रोजी राष्ट्रवादीची महत्वाची बैठक ही बोलावण्यात आली आहे. त्यांनतर अनिल देशमुख हे अजित पवार यांनी भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. पुण्यात एकीकडे हि सर्व घडलं असताना दुसरीकडे अजित पवार यांच्या बंगल्यावर आमदार, खासदार यांची बैठक ही बोलावण्यात आली होती.
Share Now