कोल्हापूर वैभववाडी प्रस्तावित रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी झाली गोव्यात उच्चस्तरीय बैठक, खासदार धनंजय महाडिक यांचा पाठपुरावा

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 49 Second

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क

कोकण रेल्वे सल्लागार समितीची बैठक आज गोवा येथे पार पडली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोल्हापूर ते वैभववाडी या प्रस्तावित नव्या रेल्वे मार्गाबद्दल सविस्तर चर्चा झाली. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर ते वैभववाडी हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर तयार व्हावा अशी आग्रही मागणी या बैठकीत केली.

सुमारे सात वर्षांपूर्वी कोकण रेल्वे प्रकल्पांतर्गत कोल्हापूर ते वैभववाडी या रेल्वे मार्गाची मागणी खासदार महाडिक यांनीच केली होती त्या नंतर तत्कालीन रेल्वेमंत्री नामदार सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. मात्र अजूनही या प्रकल्पाला म्हणावी तशी गती मिळालेली नाही किंबहुना कोल्हापूर वैभववाडी प्रस्तावित रेल्वे मार्गाला आवश्यक इतका निधी शासन स्तरावर मंजूर झालेला नाही.

सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प पी पी पी तत्त्वावरती करावा असा प्रस्ताव होता मात्र त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता या प्रस्तावाची अंमलबजावणी रेल्वे मंत्रालयाच्या मध्य रेल्वे विभागाकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

त्यानुसार कोकण रेल्वेने कोल्हापूर ते वैभववाडी प्रस्तावित रेल्वे मार्ग प्रकल्प मध्य रेल्वे कडे हस्तांतरित केला आहे. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर या प्रस्तावाला मंजुरी मिळेल आणि प्रत्यक्ष काम सुरू होईल.

याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्या दृष्टीने आजच्या बैठकीला कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. या प्रकल्पाला गती देण्यासाठी पुढील महिन्यात आणखी एक व्यापक बैठक व्हावी अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली, त्यालाही आजच्या बैठकीत संमती देण्यात आली. त्यामुळे लवकरच कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम सुरू होईल,अशी आशा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीलाही मोठी गती मिळणार आहे.

त्यातून व्यापार- उद्योगाला चालना मिळणार आहे. कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग नजीकच्या काळात जयगड बंदराला जोडण्याचाही विचार आहे. त्यामुळे व्यापार उद्योगाला भरभराटीचे दिवस येतील आणि आर्थिक उलाढाल वाढेल. कोल्हापूर वैभववाडी रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर अस्तित्वात यावा, यासाठी खासदार महाडिक सातत्याने पाठपुरावा करत असून, आजची बैठक हा त्यातीलच एक भाग होता.

या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री एम के प्रेमचंद्रन, इराप्पांना काडादी, उमेश जाधव, गोव्याचे खासदार फ्रान्सिसको सर्दीना यांच्यासह रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता, संचालक संतोष कुमार झा, राजेश भडंग, मुख्य अभियंता नागदत्त राव, चीफ मॅनेजर एन एम तेलंग, डेप्युटी जनरल मॅनेजर श्रीमती आशा शेट्टी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आजच्या बैठकीमुळे कोल्हापूर ते वैभववाडी या प्रस्तावित रेल्वे मार्गाला अधिक गती मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *