कोल्हापूर – राज्याच्या राजकारणात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे कोल्हापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे नाराज असल्याने नॉट रिचेबल असल्याची माहिती काल समोर आली होती. याच गोष्टीचा खुलासा करण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांनी, “माझी भूमिका मी उद्या कागलमधील गैबी चौक येथील ज्युनिअर सरकारांचा वाडा येथे सकाळी १० वाजता जाहीर करणार,” असल्याचे फेसबुक पोस्ट करून सांगितले आहे. राज्यात झालेला राजकिय भूकंप आणि कोल्हापूर मधुन हसन मुश्रीफ यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि गेली सात वर्षे कागल मध्ये सुरू असलेला संघर्ष आता शांत होणार काय. भाजप राष्ट्रवादी एकत्र झाल्याने येणाऱ्या निवडणुकीत समरजीत घाटगे यांचे भवितव्य धोक्यात आल्याचे चित्र तयार झाले आहे. त्यामुळे गेले काही दिवस समरजितसिंह घाटगे नॉट रीचेबाल होते. आज त्यांनी फेसबुक वर व्हिडिओ शेअर करुन त्यांनी उद्या आपली भूमिका लोकांसमोर मांडणार असल्याचे सांगितले आहे. त्यामूळे उद्या कोल्हापूर मध्ये कोणता रजकिय भूकंप होणार होतो की काय असे वातावरण तयार झाले आहे.
उद्या माझी भूमिका स्पष्ट करेन : समरजीत घाटगे

Read Time:1 Minute, 46 Second