Share Now
कोल्हापूर : उच्च शिक्षण कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील शिक्षण सहसंचालक डॉ. हेमंत नाना कटरे, कनिष्ठ लिपिक अनिल जोंग आणि स्टेनो प्रविण शिवाजी गुरव या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ५ जुलै रोजी रंगेहाथ पकडले. तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना कार्यालयातच ही कारवाई झाली. पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती. भ्रष्ट कारभारामुळे वादग्रस्त ठरलेल्या शिक्षण सहसंचालक कार्यालयावर ही झालेली पहिलीच कारवाई होय. डॉ. हेमंत कटरे यांच्याकडे शिक्षण सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. डॉ. कटरे हे राजाराम महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत. डॉ. कटरे यांच्याकडे चार मे २०२३ रोजी शिक्षण सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. कठरे यांनी १४ जुलै २०२१ ते १३ जानेवारी २०२३ या कालावधीतही शिक्षण सहसंचालकपदाचा कार्यभार सांभाळला होता.
Share Now