Share Now
Read Time:1 Minute, 19 Second
-
रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे जागतिक डॉक्टर डे आणि सीए डे साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ करवीरतर्फे नामांकित डॉक्टर व सी. ए. यांचा सन्मान प्रेसिडेंट रो. संजय पाटील, सेक्रेटरी रो. कुशल पटेल आणि प्रमुख अतिथी डॉ. सातपूते सर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी डॉ. अविनाश सुपे, डॉ. विवेक हळदवणेकर, डॉ. विजय हिराणी, डॉ. विनोद वागळे, सी. ए. उमेश शामराव भोसले, सी. ए. पी. एन. हारुगडे यांचा सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार मुर्तीचा बायोडाटा रो. डॉ. संदिप पाटील यांनी सादर केला. या समारंभाचे सुत्रसंचालन माजी अध्यक्ष रो. निशिकांत नलवडे यांनी केले व आभार प्रदर्शन सेक्रेटरी रो. कुशल पटेल यांनी केले. यावेळी क्लबचे सर्व माजी अध्यक्ष, पदाधिकारी व मेंबर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share Now