कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी, कारखानदारीला चालना देण्यासाठी नवी दिल्लीत ’कोल्हापूर डेव्हलपमेंट सेंटर’सुरू करण्यात येत आहे. कोल्हापूर डेव्हलपमेंट सेंटरशी संलग्न असल्यास उद्योजक-कारखानदारांना आणि स्वयंसेवी संस्थांना आपल्या प्रोजेक्टच्या कामासाठी दिल्लीलाही येण्याची आवश्यकता नाही. कारण कोल्हापुरातील उद्योग-व्यावसायिकांच्या व स्वयंसेवी संस्था दिल्लीशी निगडीत प्रश्नांची सोडवणुकीला या सेंटरच्या माध्यमातून प्राधान्य असेल. असे भारताचे माजी राजदूत व राष्ट्रीय मानव अधिकार आयोग चे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांनी स्पष्ट केले. व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आदरणीय ज्ञानेश्वर मुळे उपस्थितांशी संवाद साधला.
‘चांगुलपणाची चळवळ’ या अभियानतंर्गत मंगळवारी (पंधरा ऑगस्ट) समावेश ए पॉझिटिव्ह इन्स्टिव्हेटिव्ह’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कोल्हापुरातील स्वयंसेवी संस्थेसह विविध घटकातील मान्यवरांचा सहभाग होता.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धनंजय महाडिक हे होते.
धनंजय महाडिक यांनी आपल्या भाषणामध्ये मुळे साहेबांनी दिल्लीत असताना फोन करून मला पंधरा ऑगस्ट ला कोल्हापूरातील या कार्यक्रमाला येण्यास सांगितले मी ही त्या दिवशी कोल्हापुरात असल्याचे सांगून या कार्यक्रमाला मी आज उपस्थित आहे. मला इथे येईपर्यंत कसला कार्यक्रम आहे याच काहीच कल्पना नव्हती पण मुळे साहेबांचे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नाहीत, व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे त्यांनी उपस्थिती लावून चांगुलपणाची चळवळ या अभियान अंतर्गत कोल्हापूरच्या समस्या सोडवण्यासाठी दिल्लीमध्ये कोल्हापूर डेव्हलपमेंट सेंटर कार्यालय सुरु करत असल्याचे सांगितले.
कोल्हापूरकरांसाठी अत्यंत चांगुलपणाची गोष्ट आहे.
पण कोल्हापुरात काही चांगलं करायचा असेल तर प्रथम त्याला विरोध होतो,
मी लोकसभेचा खासदार असताना अनेक विकास कामासाठी संसदेत सातत्याने प्रश्न मांडले काही प्रस्ताव मी मंजूर करून घेतले लोकसभेमध्ये माझ्या कामाची दखल घेऊन सलग तीन वेळा माझी संसद रत्न महणून गौरवण्यात आले.
पण दुर्दैवाने 2019 ला मी पराभूत झालो
आणि विरोधकांनी बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक माझ्यावर आरोप केले बास्केट ब्रिज हवेत / विमान सेवा बतीस तारखेला सुरू होणार/ रेल्वे आज उद्या परवा सुरू होणार /अशा स्वरूपात भाषण करून माझी बदनामी केली पण मी थांबलो नाही चांगल्या गोष्टीला विरोध होतच असतो लक्षात ठेवून मी प्रयत्न करत राहिलो 2022 ला राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्याने मी पुन्हा सुदैवाने राज्यसभेवर निवडून आलो लगेच मी कामाला सुरुवात केली
विरोधकांनी माझ्यावर आरोप केल्यामुळे मी कोल्हापूरचा विकास कामासाठी झपाटाच घेतला.
एका वर्षात विमानतळाचे विस्तारीकरण करून अनेक विमाने चालू केली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते बास्केटब्रीचे कामाची भूमिपूजन केले. पावसाळा संपताच त्याचे काम सुरू होईल. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर ते वैभववाडी या 3411 कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाला मंजुरी दिली. कोल्हापूर रेल्वे साठी 43 कोटी रुपयाची विकास कामास सुरुवात झाली. वंदे भारत रेल्वे ही लवकरच सुरू होईल.
असे अनेक कामांना गती देऊन कोल्हापूर नंदनवन कसे होईल हेच माझे ध्येय असून मुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लोकप्रतिनि म्हणून आम्ही चांगले काम करत असताना कुठे तरी आमचा गाडा थांबतो म्हणून लोकांची पण यात पाटबळ सहभाग असायला पाहिजे कोल्हापूरच्या विकास कामासाठी तुम्ही सर्वजण एकत्र या मुळे फाउंडेशन व चांगुलपणाची चळवळ अभियानास माझे सतत पाठबळ राहील व पुढील कामासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद!
कार्यक्रमाचे संयोजक मुळे फाऊंडेशनचे सदस्य अनिल नानिवडेकर , दिल्ली येथील आलेले दोन संयोजक निष्कर्ष आणि सिद्धांत व पारस ओसवाल, आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हॉटेल पॅव्हेलियन येथे हा कार्यक्रम झाला.
या वेळी सिमॅकचेे अध्यक्ष, गोसीमाचे अध्यक्ष, व कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी चे अध्यक्ष, युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष, अवनी संस्थेच्या अध्यक्ष, एम वाय पाटील (रत्ना उद्योग), स्वयंसेवी संस्था चालक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.