युवा पत्रकार संघ आयोजित दिल्ली पत्रकार अभ्यास दौरा सांगता..

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:9 Minute, 53 Second

कोल्हापूर दि: युवा पत्रकार संघाच्या वतीने विश्वकर्मा अपार्टमेंट येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत कोल्हापूर व सांगली जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. विविध विषयावर चर्चा करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण मधील पत्रकार व यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली, समितीच्या मार्फत पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेऊन त्या शासन स्तरावर सोडवण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष: शिवाजी शिंगे यांनी सांगितले.
पुढे ते बोलताना म्हणाले. दिल्ली दौऱ्यावर असताना दिल्ली मधील राष्ट्रीय मानव अधिकार आयोग दिल्ली चे आदरणीय ज्ञानेश्वर मुळे यांची भेट घेउन पत्रकार संघाचे कार्याबद्दल माहिती दिली. संघाच्या समस्या बद्दल यांना बोललो असता त्यांनी चांगलपणाची चळवळ या उपक्रमा मध्ये सहभाग होण्याची निमंत्रण दिले,
ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन चांगुलपणाची चळवळ हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी आम्ही सुरू केले असून त्यामध्ये तुमची युवा पत्रकार संघ सहभाग घेऊन तळगातील लोकांपर्यंत योजना पोचवू त्यामुळे चांगुलपणाची पण कार्य चांगलं होईल युवा पत्रकार सघाचे पण प्रगती होईल असे त्यानी सूचना दिल्या
आपले सर्व युवा पत्रकार संघाची सभासद संपूर्ण महाराष्ट्रातील सहभाग घेऊन आपली अनेक शासकीय योजनांचा लाभ घेऊ
युवा पत्रकार संघाचे उगम स्थान कोल्हापूर शहरा मध्ये आहे व त्याचे प्रमुख पदाधिकारीही आपल्या जिल्ह्यात आहेत पत्रकार संघाचे उद्देश साध्य करायचं असेल तर जबाबदारी पदाधिकारी यांनी ग्रामीण पत्रकारांच्या कडे लक्ष दिले पाहिजे लॉकडाऊनच्या काळामध्ये मी स्वतः व पवार/ माळी यांच्या सह दीडशे किलोमीटर रोज टू व्हीलर वरून प्रवास करुन ग्रामीण भागातील समस्या जाणून घेतले आहे
अत्यंत दुर्गम भागामध्ये शासनाचे काही योजना पोहोचत नाही काही वाडी वस्त्यांमध्ये तर पाण्याचा सुकाळच आहे तेथील अनेक नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. त्याचीच प्रचिती घेऊन
गाव बांधावरच्या बातम्यांच्या माध्यमातून शासन स्तरावर सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रोज मांडत असताना
तेथील स्थायिक पत्रकार कोण कोणत्या अडचणींना सामोरे जाव लागत, त्यांचे प्रश्न सोडवताना पत्रकार बंधु या नात्याने त्यांच्या कडे पाहीले पाहिजे असे त्यांनी नमुद केले.

कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शरद माळी

यांनी दिल्ली पत्रकार अभ्यास दौऱ्याची संपूर्ण माहिती उपस्थितीना सांगितले. संसद भवन, राष्ट्रपती भवन, सुचना भवन, (RNI) भवन, महाराष्ट्र परिचय केंद्र, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भवन, शाळा, मोहल्ला किलनीक, इंटरनॅशनल विमानतळ, मेट्रो, लाल किल्ला, जामा मशीद ,मीना बाजार मॉल, प्रेस क्लब ऑफ इंडिया या संपूर्ण ठिकाणी भेट देऊ अभ्यास करुन आमच्या ज्ञानात भर पडले आहे,
याचे संपूर्ण श्रेय शिंगे साहेबांना आहे शिंगे साहेबांचे मी मनापासून आभार मानतो.

दिल्ली पत्रकार अभ्यास दौरा विशेष सहकार्य राज्य सभेचे खासदार संसद रत्न धनंजय महाडिक यांच्या उपस्थित रेल्वे स्टेशन येथे पत्रकार अभ्यास दौराची सांगता करण्यात आली.

या वेळी जावेद देवडी आपल्या मनोगतात म्हणाले

नऊ नऊ २००९ ला पत्रकार संघाची स्थापना झाली आहे त्या अनुषंगाने वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करायचा आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन साथ देऊन हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करूया कार्यक्रमा मध्ये काय काय सहभाग करायचा याची सर्वांनी आठ दिवसात सुचना द्यावे असे सांगितले.

अझरुद्दीन मुल्ला यांनी आपल्या मनोगत

युवा पत्रकार संघाने गेल्या चौदा वर्षांमध्ये संघर्षमय प्रस्थापित पत्रकारांना सामोरे जाऊन पत्रकार संघटना टिकून महाराष्ट्रात दहा जिल्ह्या पर्यंत शिंगे साहेब व सभासद यांनी पोहोचवली आहे मी याच वर्षी संघात आलोय पत्रकारीता करीत असताना आपली पण चूक होत असतात पुन्हा पुन्हा तीच चूक होऊ नये म्हणून जाणकार अनुभवी व आपल्या संघातील प्रमुख पदाधिकारी यांच्यातर्फे कार्यशाळा घेऊन नवीन नवोदित पत्रकारांना प्रशिक्षित केले पाहिजे म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अडचणी येणार नाहीत लवकरच त्याचे नियोजन करून कार्यशाळा घ्यावी असे सांगितले.

रतन हुलस्वार म्हणाले.

२००४ सालापासून पत्रकारिता करताना आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागले अंक टाकण्यापासून बातम्या गोळा करून आणून लिखाण करून आपल्या अंकात प्रसिद्धी करून वाचकांना देऊन वाचकांच्या व संपादकाचे वाहवा मिळेपर्यंत आम्हाला चेन पडत नसे पण काळानुसार बदल घडुन अत्याधुनिक यंत्राचा वापर करून यूट्यूब चैनल, ट्विंटर, फेसबुक, वेबसाईट इंस्टाग्राम ऑनलाईन सारखे माध्यम आता झपाट्याने वाढत गेलीत तरी ही जुने पत्रकार आपली कात्त टाकून त्यातही प्रगती करत आहेत,
आता प्रिंट मीडिया देखील ऑनलाइन मध्ये उतरले आहे, वाचकांच्या पसंतीनुसार आपल्याला बदल करावा लागतो हे मात्र खर!
नवीन नवोदित पत्रकार व संघातल्या सर्व सभासदांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत कोणतीही अडचण आल्यास जरूर माझी आठवण काढा मी तुमच्यासाठी धाव घेऊन येईन.
मी तुम्हाला जास्त दिसत नसलो तरी माझ्या अनुभवाच्या जोरावर मी शासन स्तरावर संघाचे पत्र व्यवहार करत असतो शिवाजी अध्यक्ष या नात्याने पुढाकार घेऊन सर्व करत असतो पण संघटना चालवणे एकट्याचं काम नाही आहे, म्हणून शिवाजी च्या पाठीमागे अनेक लोक आमच्यासारखे खंबीर पणे आहेत म्हणून संघटना महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून अनेक जिल्ह्यांमध्ये पोहचली आहे लवकरच संघाकडून पत्रकार हिताच्या योजनांचे सभासदांसाठी एक मोठा प्रोजेक्टचे काम सुरु होनार आहे. अंतिम टप्प्यात असून लवकरच याची व्यापक बैठक घेऊन माहिती देण्यात येईल असे हुलस्वार म्हणाले.

सांगली जिल्हा अध्यक्ष प्रविण मिरजकर

सांगली जिल्हा अध्यक्ष यांनी या बैठकीला उपस्थित राहून मला सांगली जिल्ह्यामध्ये पत्रकार संघाची विस्तार करून व चांगला एक मोठा कार्यक्रम घेणार असल्याचे सांगितले त्यासाठी सर्वांची सहकार्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाले.

या वेळी बावडा मिसळच्या संचालिका सौ. पुजा रत्नदिप चव्हाण, राज्य सदस्य मोहसीन मुल्ला, डि. एस. कोंडेकर, कौतुक नागवेकर,  विश्वकर्मा डेव्हलपर्सचे संचालक श्री नितीन गावडे इ. उपस्थित होते शेवटी रत्नदीप चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

तर प्रकाश कांबळे यांनी उपस्थित यांना चहापान दिला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *