विषेश वृत्त: कौतुक नागवेकर
सांगली दि. :- पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे झालेल्या पोलीस अंमलदारांच्या क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 8 च्या वार्षिक क्रीडा स्पर्धा 23 ते 25 ऑगस्ट या कालावधीत प्राचार्य धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या. या स्पर्धा खोखो, कबबड्डी, भालाफेक, कुस्ती अशा 20 क्रीडा प्रकारात झाल्या. स्पर्धेत 500 प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला.
स्पर्धा बक्षीस वितरण समारंभानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी प्रशिक्षणार्थींच्या तंदुरूस्तचे कौतुक करून, त्यांना भविष्यातील आव्हान व आयुष्यात व्यायामाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उप प्राचार्य (प्रशासन) उदय डुबल, उपप्राचार्य (प्रशिक्षण) सुजय घाटगे यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.