“गेला उडत” उद्यापासून सर्वत्र प्रदर्शित…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क

आपण हवेत उडू शकतो असं जर कुणी म्हटलं तर? आपला साहजिकच त्याच्यावर विश्वास बसणार नाही किंवा मग आपण विचारु की रॉकेटमधून ? पण या कोणत्याही साधनाशिवाय आपण हवेत उडू शकतो असं कुणी म्हटलं तर? जसे हनुमंत रामायणात सीतामाईच्या शोधासाठी उडत गेले होते तसंच ? असं घडलं तर नेमकं काय होईल तेच दाखवण्यासाठी एका आगळ्या-वेगळ्या कथानकासह एक नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय… गेला उडत! एका मध्यमवर्गीय व्यक्तीभोवती हे कथानक गुंफलेलं आहे.

Advertisements

गरीबीचे चटके, कुटुंबातल्या जबाबदाऱ्या, आपल्याच कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या, त्या पूर्ण करण्यात सातत्याने येणारं अपयश यामुळे चित्रपटातल्या मुख्य पात्राचं आयुष्य ग्रस्त असतं. पण भगवान हनुमान अर्थात त्याच्या हनुमंतावर त्याची प्रचंड श्रद्धा असते. आधी त्याच्यावर साहजिकच विश्वास ठेवायला लागतात खरे. पण त्याला उडताना मात्र कुणीच पाहिलेलं नाही. शेवटी एकतर आम्हाला हवेत उडून दाखव, नाहीतर परिणामांना तयार रहा असा इशाराच जेव्हा त्याला आसपासची मंडळी देतात, तेव्हा मात्र कसोटीचा क्षण उभा ठाकतो. या प्रशनाचं उत्तर तो कसं शोधतो ? तो खरंच उडू शकतो का? हे पाहण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी आपल्याला नजीकचे चित्रपटगृह गाठावंच लागेल.

या पिक्चर मध्ये शालवी शहा या अभिनेत्रीने “पत्रकाराचा” रोल केला आहे, त्याची मनापासून असा रोल मिळावा अशी तिची इच्छा होती
या फिल्ममुळे माझी छोटीशी इच्छा पूर्ण झाल्याची ती आवर्जूने या वेळी सांगितली.

मिना शमीम फिल्मस् प्रस्तुत ‘गेला उडत’ या चित्रपटाची निर्मिती मुन्नावर शमीम भगत यांनी केली आहे. चित्रपटाची कथा-पटकथेसह दिग्दर्शनही मुन्नावर शमीर भगत यांचच आहे. रफिक शेख यांनी संगीत दिलं असून पार्श्वगायन सलील अमृते यांचं आहे. मकरंद पाध्ये, ज्योत्स्ना राजे गायकवाड, प्रसाद माळी, शालवी शाह, किसन खंदारे यांच्या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. ^ एन. डी. चौगले

अंधश्रध्दा बऱ्याचदा नुकसान करणाऱ्या जरी असल्या, तरी अनेकदा त्यामुळे काही आयुष्यं पूर्णपणे बदलून जातात. अशाच एका बदललेल्या आयुष्याची कथा ‘गेला उडत’ सर्व चित्रपटगृहात उद्या पासून प्रेक्षकांना पाहण्यास मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *