शाहुपूरी पोलीसांची धडक कारवाई
वारांगणाकडे येणारे अंबट शौकीन गि-हाईकावरच थेट कारवाई होणार… असल्याने,वारांगणाचे ठिय्या दुसरीकडे हलवण्याकडे कल
शाहुपूरी पोलीसांची धडक कारवाई नागरिकाकडून समाधान व्यक्त करत महिनाभर सतत पेट्रोलिंग करून कारवाई केल्यास पुन्हा या परिसरात वारंगांना दिसणार नाहीत अशी चर्चा परिसरातील नागरिकांच्यात सुरू होती.
मा. पोलीस अधीक्षक श्री महेद्र पंडीत मा. अपर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई यांचे
मार्गदर्शनाखाली शाहुपूरी पोलीस ठाणे हददीत व्हीनस कॉर्नर ते रेल्वे स्थानकचे परिसरात येणारे-जाणारे
पादचारी महिला व पुरुष यांना वारांगनाकडे येणारे अंबट शौकीन गि-हाईकांकडून त्रास होत असलेच्या
तक्रारी प्राप्त झालेने त्या अनुषंगाने वरील ठिकाणी पेट्रोलिंग करून कारवाई करणेबाबत मा. उप विभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, शहर विभाग कोल्हापूर यांनी दिले सुचनेप्रमाणे
शाहुपूरी पोलीस ठाणेचे नि. प्र. अजय सिंदकर, तसेच सपोनि कोल्हाळ, पोलीस अंमलदार संदीप पाटील, विनायक फराकटे, संजय जाधव, अनिल पाटील, महेद्र पाटील, मिलीद बांगर, विकास चौगले, रवि आंबेकर महिला पोलीस अंमलदार वनिता घारगे, सविता पाटील, निलोफर सनदे शाहुपूरी पोलीस ठाणे यांनी काल रात्री 21.00 वा ते 24.00 वा. पर्यंत पेट्रोलिंगद्वारे छापा टाकून
1] सागर प्रकाश यादव, रा. निगवे,
2] अमोल विनायक कवाळे रा. राजारामपुरी,
३] विकास गिरजा शंकर शर्मा रा. रंकाळा,
4] प्रथमेश अमर बुरसे रा. राजारामपुरी,
5] सुनिल दादु गोसावी रा. कुरुकली.
6] प्रथमेश माणिक घोडके रा. वडणगे,
7] शफावत हमीद खाटीक रा सोमवार पेठ, कोल्हापूर,
8] समीर नसरुददीन मणेर रा. कळंबा,
9] हरीदास दत्तात्रय पंदारे रा. कुडाळ,
10] अजित तानाजी गोसावी रा. कुरुकली,
11] चेतन किशोर आनंदानी रा. राजारामपुरी कोल्हापूर,
अकरा व्यक्तींना ताब्यात घेऊन घेऊन त्याचेवर बीपीॲक्ट प्रमाणे कारवाई करणेत आलेली आहे.
येथून पुढे देखील अशीच कारवाई होणार असलेचे पोलीस निरीक्षक सिंदकरसो , यांनी सांगीतले आहे. तर आज व्हीनस कॉर्नर परिसरात शुकशूकाट होती त्यामुळे शाहुपूरी पोलीसाचे कारवाईमुळे परीसरातील व्यापारी व नागरीकांनी समाधान व्यक्त कौतुक होत आहे.