ज्युनीयर मेहमूद आणि कोल्हापुर….

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 23 Second

ज्युनीयर मेहमूद आणि कोल्हापुर….

अमराठी असून देखील मराठी वर नितांत प्रेम असणाऱ्या बॉलीवुड मधील कलाकारामध्ये ज्युनियर मेहमूद हे नाव अग्रकमाने घ्यावे लागेल . बाल कलाकार म्हणून हिन्दीमधे कारवां चित्रपटामधून आपल्या कारकीर्दीची दमदार सुरुवात करणाऱ्या ज्युनियर मेहमूद यानी सर्वाधिक व्यस्त बाल कलाकार अशी आपली ओळख निर्माण केली होती .

कोल्हापूर आणि ज्युनियर मेहमूद हे अजोड़ समीकरणच बनले होते. तरुण झाल्यावर ज्युनियर मेहमूद यांना बॉलीवुड मध्ये फारसे यश मिळाले नाही .

पण सहायक अभिनेत्याच्या अनेक भूमिका त्याना मिळाल्या .स्वतंत्ररित्या चित्रपट दिग्दर्शक म्हणून काम करताना त्यानी मराठी चित्रपटाला प्राधान्य दिले. अमराठी असून देखील मराठी चित्रपट दिग्दर्शनावर भर देणाऱ्या ज्युनियर मेहमूद यांचे कोल्हापुरात निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम करणारे मुन्ना शेख आणि माझ्याशी अगदी घरोब्याचे संबंध होते. माझ्या लुनावरुन ते कोल्हापुरात माझ्यासोबत फिरायचे . 

आमच्या आईच्या हातची दम बिर्याणी हा ज्युनियर भाईचा ‘वीक पॉइंट’ होता. आमच्या जवाहरनगर मध्यलया दहा बाय दहाच्या खोलीत संकोच न करता हा ‘लिज्ण्डरी’ कलाकार मनसोक्त पणे बिर्यानी वर ताव मारायचा . छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील (माळकर तिकटी) अवंती लॉज हे त्यांचे राहण्याचे आवडते ठिकाण होते. त्यानी दिग्दर्शित केलेल्या मराठी चित्रपटाच्या प्रिंट्स चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अंबाबाई देवीच्या चरणी ठेऊन आशीर्वाद घ्यायची परंपरा त्यानी पाळली . त्याना सोबत घेऊन मी माझ्या कॉमन मैन क्रिएशन्स संस्थेतर्फे रफी की याद में हा कार्यक्रम २००५ साली केशवराव भोसले नाट्यगृहात ‘ रफी की याद में’ हा कार्यक्रम आयोजित केला होता .

 या कार्यक्रमा साठी आपली फ़ियाट गाड़ी चालवत मुंबई हुन ज्युनियर भाई कोल्हापुरला आले होते .त्यांची राहण्याची व्यवस्था ताराबाई पार्क येथील हॉटेल विजयराज मध्ये मी केली होती .

 या कार्यक्रमाच्या रंगीत तालमी मटण मार्केट परिसरातील हॉटेल जयहिंद दरबारच्या तळमजल्यावर असलेल्या मनपसंद कैसेट्स या दुकानात केल्या होत्या. अयाज फकीर ,रहीम शेख ,सादिक खाटीक यानी यासाठी परिश्रम घेतले होते . अलीकडील चार पाच वर्षात ज्युनियर मेहमूद यांचा कोल्हापुरशी फारसा संपर्क नव्हता .रियालिटी शो च्या निमित्ताने परदेश दौरे असल्याने कोल्हापुरशी त्यांचा फारसा संपर्क राहिला नव्हता. गेले वर्ष दीड वर्षे कर्करोगा सारख्या व्याधीशी झुंजत असलेल्या ज्युनियर मेहमूद यानी कोल्हापुरशी मात्र अकृत्रिम नाते जपले एवढे मात्र नक्की !

आज मात्र आपल्यात ते राहिले नाहीत.

  माझ्या या मित्राला अल्लाह जन्नत मध्ये स्थान देवो हीच प्रार्थना . –

ज्येष्ठ पत्रकार नवाब शेख ,७७४१८५११५५

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *