कौतुक नागवेकर/ सांगली शहर पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी मोडून काढतानाच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता कठोर भुमिका बजावणार. सांगली शहर पोलिस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी केला. संजय मोरे यांनी नुकताच सांगली शहर पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला. त्यावेळी संजय मोरे बोलत होते. एका वर्षभरापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यात देखील आपल्या कामाचा ठसा उमटून विश्राम भाग येथे बदली झालेल्या पोलीस निरीक्षक संजय मोरे यांची चांगली शहर पोलीस ठाण्याकडे पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाली.
या वेळी मोर बोलताना सांगली शहर पोलिस ठाण्याकडील कामकाज पध्दत पाहता लवकरच गुन्हे प्रकटीकरण शाखेची पुनर्बाधणी केली जाईल. अशी माहिती संजय मोरे यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठांसह अनेक महत्त्वाची थेट ठिकाणे सांगली शहर पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात येतात.
पोलिस प्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी सांगली शहर पोलिस ठाण्याची मोठी जबाबदारी सोपविली आहे. यापूर्वी आपण एक वर्षभर विश्रामबाग पोलिस ठाण्याचा कार्यभार सांभाळला होता.
सांगली शहरातील वाहतुकीसह कायदा आणि सुव्यवस्थेचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेतले जातील. आगामी लोकसभा व विधानसभा यासह अन्य निवडणुका व राजकीय घडामोडी लक्षात घेता आवश्यक ती पावले उचलली जातील. कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता वेळोवेळी कठोर पाऊल उचलले जतिल.
- मोहल्ला व शांतता समितीसह नागरिकांशी संवाद ठेवण्यावर भर देणार आहे. त्यासाठी आपल्यासह गस्तीवरील प्रमुख पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे भ्रमण ध्वनी क्रमांक सार्वजनिक केले जाणार असून. जेणेकरुन कोणत्याही अडचणीत सामान्य व्यक्तीला पोलीसांशी संपर्क
साधता येईल.
याशिवाय महिला सुरक्षा यावर विशेष लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.
बाल गुन्हेगारी व रस्त्यावरील हिंसाचार रोखण्याकरिता सहकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करुन पुढील दिशा निश्चित करणार आहे. सराईत गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तडीपार व मोका यासारखे प्रस्ताव तयार केले जातील.
त्यासाठीचा प्रस्ताव तयार असून लवकरच याची अंमलबजावणी झालेली पहायला मिळेल,
असा मत ही पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केला.