डिजिटल मिडिया संपादक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन कणेरी इथल्या सिद्धगिरी मठावर आज झालेल्या कार्यक्रमात,
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत .
युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांना डिजिटल स्टार ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कृष्णराज महाडिक यांचा शाल, श्रीफळ आणि पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. कृष्णराज हे संसदरत्न खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र असून, बालवयातच त्यांनी कार रेसिंगच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवले. त्यानंतर देश-विदेशात झालेल्या अनेक कार रेसिंग स्पर्धेत त्यांनी चमकदार कामगिरी करत, लक्षवेधून घेतले. गेल्या काही वर्षात सोशल मीडयावर ते प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.
त्यांचे ब्लॉग वाचणार्यांची संख्या कोटीच्या घरात आहे. कोल्हापूरसह राज्यभर आणि देशातही तरूणाईमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे.
विशेष म्हणजे सोशय मिडियावर पोस्ट टाकून त्यातून मिळणारे उत्पन्न त्यांनी कष्टकरी, गरजू आणि वंचित लोकांसाठी खर्च केले आहेत. त्यामध्ये निराधारांना अन्न, औषधे आणि कपडे वाटप, पावसामुळे घर पडलेल्या वृध्देला नवीन घर बांधून देणे, साडी वाटप, उबदार ब्लँकेट वाटप, रिक्षाचालकांना दरवाजे आणि मीटर वाटप असे शेकडो उपक्रम कृष्णराज यांनी आजपर्यंत राबवले आहेत.
त्याशिवाय शहर सुशोभिकरणासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. तरूण वयातच समाजाप्रती संवेदनशिलता आणि कणव बाळगणार्या या युवा व्यक्तीमत्वाला डिजिटल स्टार ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा गौरव आणि सन्मान करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल कृष्णराज महाडिक यांचे युवा वर्गामध्ये उत्साहात विविध स्तरातून कौतुक आणि अभिनंदन वर्षाव होत आहे.