पेठवडगाव प्रतिनिधी/ ॲड, बी. आर. चौगुले
पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावर्डे तालुका हातकलंगडे जिल्हा कोल्हापूर येथील लोकनियुक्त सरपंच अमोल शिवाजी कांबळे यांना ग्रामपंचायत ऑफिसमध्ये जाब विचारून मारहाण करण्यात आली. गावात गेले सात दिवस पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी निवेदन देण्याच्या बहाना करून सरपंचांना मारहाण करण्यात आली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करण्या आली.
लोकनियुक्त सरपंच अमोल कांबळे
सावर्डे गावाचे महावितरण कंपनीचे लाईट बिलाचे ३२ लाख रुपये पेंडिंग असल्यामुळे गावात गेल्या सात दिवसापासून पाणीपुरवठा बंद आहे. यावेळी निवेदन देणेच बहाणा करून अनिल दिनकर पाटील, बाळासो आनंदा चव्हाण, सुहास चव्हाण, सुनिल चव्हाण. यांनी तु पाच वर्षे खुर्चीवर कसा राहतोस बघतोच तुला असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून सरपंच यांना मारहाण करण्यात आली.
यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण होऊन ग्रामस्थांकडून वडगाव पोलीस ठाण्याला घेराव घालण्यात आला होता.
वरील प्रकरण वडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास भोसल यांनी गांभीर्य लक्षात घेऊन शेळके यांना गुन्हा दाखल करण्यास सूचना दिल्या, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग हे करीत आहेत.