सचिन कोडोलकर यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड…

 

पन्हाळा प्रतिनिधी /शहादुद्दीन मुजावर

माले, तालुका पन्हाळा येथील सचिन परशुराम कोडोलकर यांची जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवाशक्तीच्या पन्हाळा तालुक्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीचे पत्र जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व शाहुवाडी पन्हाळा विधानसभा चे विद्यमान आमदार विनय कोरे यांनी नुकतेच कोडोलकर यांना सुपूर्द केले.

Advertisements

पन्हाळा पूर्व भागातील माले गावातील सचिन कोडोलकर हे नेहमीच आमदार विनय कोरे यांचे कट्टर समर्थक राहिले असून ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.त्यांची
सर्वसामान्यांच्या हाकेला ओ देणारा माणूस म्हणून ओळख आहे .त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षासाठी देखील चांगले योगदान दिले आहे .त्याचीच पोच पावती देत पक्षाच्या केंद्रीय कार्यकारणीच्या झालेल्या बैठकीत कोडोलकर यांची जनसुराज्य शक्ती पक्ष युवाशक्तीच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल कोडोलकर यांना आमदार विनय कोरे, पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदुरकर, वारणा सहकारी साखर कारखान्याचे युनियन लीडर महादेव पाटील, जय भवानी पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन सचिन जमदाडे, बलभीम सेवा सोसायटीचे संचालक प्रशांत पाटील, ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलचे चेअरमन शिवलिंग कळंत्रे, एस न्यूज चे संपादक कृष्णात जमदाडे आदींचे सहकार्य लाभले.

दरम्यान या निवडीनंतर आमदार विनय कोरे यांनी आपल्यावर दाखविला विश्वास सार्थ करण्यासाठी, पक्षाच्या वाढीसाठी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणार असल्याचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवाशक्तीचे नूतन तालुका उपाध्यक्ष सचिन कोडोलकर यांनी सांगितले. कोडोलकर यांची सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे त्यांच्या या निवडीबद्दल ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन माले यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

फोटो कॅप्शन:जनसुराज्य शक्ती पक्ष युवाशक्तीच्या तालुका उपाध्यक्षपदी सचिन कोडोलकर यांची निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना आमदार विनय कोरे यांचे सोबत आदी मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *