साहित्यिक अकादमी पुरस्कारप्राप्त कृष्णात खोत यांचा पन्हाळगडावर नागरी सत्कार.

पन्हाळा प्रतिनिधी, शहादुद्दीन मुजावर, पन्हाळगडाच्या रेडीघाट या जंगलाच्या पायथ्याशी असणाऱ्या निकमवाडी हे गावाचे सुपुत्र कृष्णात खोत, यांनी गावठाण, 2005, रेंदाळा 2008, झड-झिबड 2012, धूळमाती 2014, रिंगाण 2018 ,या त्यांच्या प्रकाशित झालेल्या कादंबऱ्या असून या कादंबऱ्यामधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव्य त्यांनी चित्रण केले आहे.

  • रिंगान या कादंबरी कृष्णात खोत यांनी विस्थापित झाल्यानंतर आपल्या भूमी पासून लांब फेकले लोकांची धरणग्रस्ताची भावना,त्यांचे झालेले हाल अपेष्टा रिंगाण मध्ये मांडले आहेत, या कादंबरीला 2023 या वर्षी साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन पन्हाळा तालुक्याचे नाव जगभरात पोहोचवल्याबद्दल साहित्यिक क्षेत्रामध्ये सर्वाधिक श्रेष्ठ मानला जाणारा पुरस्कार ‘ साहित्यिक अकादमी पुरस्कार ‘ प्राप्त झाला आहे.

या निमित्त या पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा आज पन्हाळा शहरवासीयांच्या वतीने नागरी सत्कार च्या आयोजन केले होते .

या नागरिक समितीचे अध्यक्ष प्राचार्य एम जी गायकवाड सर होते .तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. डॉ,आमदार विनय कोरे, हे उपस्थित होते. कार्याध्यक्ष अध्यक्ष म्हणून प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते.तसेच शिक्षण नेते दादा लाड, साहित्यिक अकादमी पुरस्कार करते कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ चे माजी मराठी विभाग प्रमुख मा. डॉ. श्री . राजस गवस प्रमुख उपस्थिती होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,या सत्कार प्रसंगी लेखक हा कायम विरोधी पक्षाचा काम करत असतो, तो कुणाची हुजरी गिरी करत नाही, तो कुणाची गुलामगिरी करत नाही. तसेच चाललेली राजकीय परिस्थिती बद्दल भाष्य केले.आज नेता या पक्षात असतो तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या पक्षात असतो, आणि तो नेता म्हणतो की, आम्ही विकासासाठी त्या पक्षात गेलो आहे. अशी भयानक परिस्थिती आपल्या या लोकशाहीची झाली आहे, तसेच मा. आमदार, विनय कोरे यानीं जसे पैलवान दत्तक कारखान्यावर घेतले आहेत . तशा पद्धतीने दत्तक लेखक घ्यावे .लेखकांना भरघोस अशी मदत करावी. अशी विनंती केली. तर विनय कोरे आमदार कृष्णात खोत यांच्या बद्दल बोलताना आभाळ एवढे यश मिळवणे त्यांचे पाय इथल्या मातीशी मान राखून आहे. तसेच कृष्णात खोत यांच्याबरोबरच त्यांच्या सौभाग्यवती अनिता खोत यांचाही सत्कार महत्त्वाचा आहे .त्यांच्यामुळेच लिखाण हे खोत यांनी केली आहे.

 खोत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना , आम्ही पन्हाळा या ठिकाणी शाळेसाठी येत असताना रेडे घाट या जंगलातून करवंदे,बोरा काढताना शर्ट काढून बोरे ,करवंदे काढत असत एक वेळा अंगाआ ला काटे घुसून अंग फाटले तर चालेल परंतु कपडे फाडता कामा नये, त्यावेळी मला दारिद्र्य वाटत होते.तशा परिस्थितीत आम्ही या शाळेमध्ये शिकलो वाढलो आहे. आमची तीच श्रीमंती होती हे आता माझ्या लक्षात आले. ज्या शाळेत मी शिकलो वाढलो तिथेच माझ्या सत्कार होते हे माझे मोठे भाग्य आहे.

        यावेळी जिजामाता महिला ब्रिगेड पन्हाळा यांनी सुद्धा कृष्णात खोत , पत्नी अनिता खोत यांचा आहेर करून सत्कार केला.यावेळी सत्काराचे नियोजन दिपक दळवी.महेश कुराडे, चैतन्य भोसले, माजी नगराध्यक्ष, विजय पाटील, असिफ मोकाशी,माजी नगरसेवक अख्तर मुल्ला, सुभाष गवळी, पत्रकार,राजू मुजावर आनंद जगताप, नितीन भगवान ,राजू दळवी, नागरी सत्कार समितीचे सर्व पदाधिकारी .गावकरी नागरीक उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *