पन्हाळा प्रतिनिधी / शहादुद्दीन मुजावर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पन्हाळा हा गड आहे. मात्र या गडाच्या सौंदर्याला काही लँड माफियालोक बाधा आणत आहेत.
एवढेच नाही तर हा गड डोंगर कपारीत असून गडाच्या पायथ्याला लागुनच लोक वसती आहे डोंगरावरच डोंगर पोखरून प्लॉटिंगचा व्यवसाय करत आहेत.
मुळात हा गड खचत आहे, गडाची दरड कोसळत आहे, गडाचे बुरुज ढासळत आहेत, गडाला लागून असणारे डोंगर खचत आहेत,भुस्खलन होत आहे यातच हे बिल्डर्स लोकं अनेक ठिकाणी डोंगर पोखरून प्लॉटिंगचा गोरख धंदा चालु केला आहे.
मुळातच धोकादायक असणार्या डोंगरावर प्लॉटिंग करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे.
पैशाच्या हव्यासापोटी पन्हाळगडाच्या ऐतिहासीक ठेव्याला धोका पोहचवु पहाणार्या बिल्डर्सवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. व बेकायदेशीर व धोकादायक परीसरात होणारे प्लाॅटींगवर तात्काळ बंदी घालणे गरजेचं आहे.
पन्हाळगडाला येताना बांबरवाडी गावा मध्ये ‘ब्रह्मगिरी’ या नावाने प्लॉटिंगची साईट चालू आहे. तब्बल 12 एकर मध्ये प्लॉटिंग पाडले जात असून या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरला गेला आहे. तसेच अनेक झाडांची कत्तल केली गेली आहे. यामुळे गडाच्या सौंदर्याला बाधा तर पोहचलीच आहे शिवाय डोंगरावर असणाऱ्या प्लॉटिंगमुळे हा डोंगर खचून भविष्यात या ठीकाणी नागरीवस्ती होवुन माळीन सारखी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
अशी दुर्घटना झाल्यास मोठी जीवीतहाणी होवु शकते.यामुळे भविष्यातील हा मोठा धोका लक्षात घेता या ठिकाणच्या प्लॉटिंगला प्रशासनाने तात्काळ बंदी घालावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजीत चव्हाण यांनी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे- जाधव आणि प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे केली आहे.
तसेच या प्लॉटिंगवर बंदी घातली नाही तर, शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सुजीत चव्हाण यांनी दिला आहे.