मार्केटिंग फेडरेशन’ वर कोल्हापुरातून धनश्री घाटगे विजयी..

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 36 Second

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

शैलेश तोडकर प्रतिनिधी : राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील सहकार पॅनेलच्या सातही उमेदवारांनी विरोधी पॅनेलचा पराभव करीत विजय मिळविला. यामध्ये महिला प्रवर्गातून कोल्हापूरच्या धनश्री धनराज घाटगे यांचा विजय झाला. दरम्यान, यापूर्वी संचालक पदाच्या ‘महायुती’च्या बारा जागा बिनविरोध झाल्या असून सात जागांसाठी ही निवडणूक झाली. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला.
फेडरेशनच्या पाच जागांसाठी मंगळवारी ९९ टक्के इतके मतदान झाले. मुंबई येथील कॉटन एक्स्चेंज बिल्डिंग येथे सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये उपमुख्यमंत्री पवार यांच्या पॅनेलच्या सर्व सात जागा निवडून आल्या. तर विराधी पॅनेलला पराभवाचा धक्का बसला. महिला प्रवर्गातून धनश्री घाटगे (वंदुर, ता. कागल, यांना मिळालेली 350 मताने विजय ठरल्या ) यावेळी बोलताना नुतन संचालक धनश्री घाटगे म्हणाल्या
माजी आमदार संजय घाटगे यांचे आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. महायुतीतून उमेदवारी मिळण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही विनंती केली. त्यानुसार मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आग्रह करुन ही जागा मिळवली. त्यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी मदत केल्याने विजय सुकर झाला.
याच बरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील घाडगे कुटुंबातील व हितचिंतकांनी गुलाल उधळत जल्लोष केला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *