राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाची मानवंदना…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

कोल्हापूर, दि. 5 – : राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरु झाले आहे.

 

यानिमित्ताने शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर चित्ररथ निर्मिती करण्यात आलेली आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य तरुण पिढीला कळावे हा या मागील मुख्य उद्देश असून यानिमित्ताने दसरा चौक, कोल्हापूर येथे आज दिनांक 5 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता चित्ररथाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

Advertisements

हा चित्ररथ कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार दूरदृश्यप्रणालीद्वारे चित्ररथाचे उदघाटन करणार असून कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थिती त्याचप्रमाणे, कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन आयोग मा. राजेश क्षीरसागर,राज्यसभा खासदार धनंजय महाडिक व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांचे तसेच मंत्री सांस्कृतिक कार्य विभाग सुधीर मुनगंटीवार यांचे चित्ररथ निर्मिती कामी मार्गदर्शन लाभले आहे.

या सोहळ्यास शाहू प्रेमीनी उपस्थित राहून छत्रपती शाहू महाराजांचे कार्य मनामनात घराघरात रुजवावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *