भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून करवीरनगरीतील सौंदर्यवती राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करतील, खासदार धनंजय महाडिक

0 0

Share Now

Read Time:6 Minute, 53 Second

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क

मिस भागीरथीचा बहुमान गायत्री जांभेकरला, तर प्रफुल्ला बिडकर ठरल्या मिसेस भागीरथ
सौंदर्य क्षेत्रात महिलांना मोठ्या संधी आहेत. भागीरथी महिला संस्थेमार्फत घेतलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून इथल्या तरूणी भविष्यात राज्य-राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धेत चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून भागीरथी महिला संस्था, युवती मंच आणि भाजपतर्फे मिस अँड मिसेस भागीरथी सौंदर्य स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत गायत्री जांभेकर मिस भागीरथी, तर प्रफुल्ला बिडकर मिसेस भागीरथी पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मुकुट आणि बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
कोल्हापुरातील भागीरथी महिला संस्था संचलित भागीरथी कला – क्रीडा आणि सांस्कृतिक मंचतर्फे मिस अँड मिसेस भागीरथी सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली. शाहू स्मारक भवनमध्ये भागीरथी कला आणि क्रीडा सांस्कृतिक मंचच्या कार्याचा शुभारंभ आणि स्पर्धेचे उद्घाटन सौ. मंगलताई महाडिक, सौ. वैष्णवी महाडिक, साधनाताई महाडिक, क्रिना महाडिक, डॉ. सिमीन बावडेकर, कल्पना सावंत, अनुराधा पित्रे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे प्रायोजक अग्रवाल गोल्ड अँड सिल्वर, अग्रवाल सिल्क साडी आणि घागरा, सुवर्णधेनू युनिक स्टोअर्स, उज्वल डान्स फिटनेस आणि इव्हेंट कंपनी तसेच एसडीआर फाउंडेशनच्या संचालकांचा सौ वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. नीलम पाटील, अनुष्का भोसले, प्रिया सूर्यवंशी यांनी नृत्याविष्कार सादर केला. शिवश्री बावडेकरने कोळीगीते सादर केली. नेचर फॅशन वर आधारीत मिस भागीरथीची पहिली फेरी संपन्न झाली. गायत्री फालेने लावणी नृत्य सादर केले. प्रसिद्ध निवेदक-गायक प्रल्हाद पाटील यांनी स्पॉट गेमच्या माध्यमातून कार्यक्रमात रंगत आणली. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. संगीता सूर्यवंशी, शितल पाटील, अश्विनी कदम, रूपाराणी निकम यांनी लक्षवेधी उखाणा घेत बक्षिसांची लयलूट केली. यानंतर मिसेस भागीरथी स्पर्धेची पहिली फेरी झाली. सई पाटील, मीनाक्षी भंगे, अमृता देसाई, साक्षी पाटील, स्वाती पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज थीम सादर केली. तर काही महिलानी मराठी गाण्यांवर नृत्याविष्कार सादर केला. यानंतर मिस भागीरथी आणि मिसेस भागिरथी स्पर्धेची दुसरी फेरी पार पडली. दरम्यान गायक प्रल्हाद पाटील आणि स्नेहलता सातपुते यांनी एकाहून एक सरस गीते सादर केली. तर साहिल भारती यांनी विविध नृत्याविष्कार सादर केले. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते स्पॉट गेम मधील विजेत्या महिलांना बक्षीसं देण्यात आली. भविष्यात अशा सौंदर्य स्पर्धा ओपन थिएटरमध्ये हजारो रसिकांच्या उपस्थितीत आयोजित करण्याची घोषणा खासदार महाडिक यांनी केली. मिस भागीरथी बेस्ट पर्सनॅलिटीचा पुरस्कार मयुरी कांबळे, मिस भागीरथी बेस्ट कॉस्च्युमचा हेमांगी पांड्या, आणि तृतीय क्रमांक मृणाल पाटील यांना देण्यात आला. विजेत्या युवतींना मंगलताई महाडिक यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली. मिस भागिरथी उपविजेत्या पूजा बिडकर यांचा सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते, तर प्रथम विजेत्या गायत्री जांभेकर यांचा खासदार धनंजय महाडिक, सौ. अरुंधती महाडिक आणि मंगलताई महाडिक यांच्या हस्ते सन्मान झाला. मिसेस भागीरथी बेस्ट पर्सनॅलिटी म्हणून मोनाली घाडगे, बेस्ट क्रिएटिव्हिटीचा रूपाली रेडेकर, बेस्ट कॉस्च्यूमचा गीता भोसले, बेस्ट टॅलेंटसाठी गायत्री फाले, आणि बेस्ट स्माईलचा पुरस्कार नयना शहा यांना देण्यात आला. विजेत्यांना नितीन अग्रवाल, सिमिन बावडेकर, साहिल भारती, कल्पना सावंत, सुशील अग्रवाल, गौरी शिरोडकर, आरती तपकिरे, अनुराधा पित्रे, दुर्गा पोतदार, कृष्णा महाडिक यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेतील तृतीय विजेत्या गीता भोसले, उपविजेत्या गीता काटे यांना सौ. अरुंधती महाडिक, तर खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते मिसेस भागीरथीचा पुरस्कार प्रफुल्ला बिडकर यांना देण्यात आला. आभार प्रतिभा जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाचे नियोजन शिवानी पाटील, सीमा भोसले, शरयू भोसले, शितल तिरुके, मृदुला शिंगणापूरकर यांनी केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *