Media control News network
“पत्रकारांना टोपी” पाकीट पत्रकार परिषदेवर बहिष्कार घालण्याचे कारण आले समोर..
बीड जिल्ह्या मध्ये लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. त्यामुळे पाकीट पत्रकारिता करणाऱ्या पत्रककारांना सुगीचे दिवस आले आहेत. जे राजकीय नेते पाकीट देतील त्याची बातमी द्यायची अन्यथा बातमीच काय, त्या राजकीय नेत्याच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय अनेक ठिकाणी सुरु आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये आज एका राजकीय नेत्याच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार घालण्यात आला. कारण ऐकून राज्यतील पत्रकारांची मान शरमेने खाली नक्कीच जाईल. अशी बातमी सोशल मीडियावर फिरत असतानाच
बीड जिल्हा माजलगावमध्ये एका आमदाराने आज पत्रकार परिषद ठेवली होती. बातमीसाठी हे आमदार महोदय, पत्रकारांना लायकीप्रमाणे पाकिटे देत असतात. ( अ – वर्ग ) वृत्तपत्र पत्रकारांना ५ हजार, ब – वर्ग पत्रकारांना ३ हजार , क – वर्ग पत्रकारांना २ हजार आणि युट्युब आणि वेब पोर्टल, साप्ताहिक वृत्तपत्र पत्रकारांना ५०० रुपयाचे पाकीट देण्यात आले. म्हणून स्वाभिमान पत्रकार, परिषदेवर बहिष्कार टाकून रागारागाने शिव्या -शाप देत निघून गेले. त्याची बीड जिल्ह्यात चवीने चर्चा सुरू असतानाच
पुन्हा आज अनुभुती आली पत्रकार परिषद वेळी कमर्शियल प्रेस असताना सामाजिक स्वरूप देऊन उपस्थितीत पत्रकारांना भेटवस्तू म्हणून चक्क टोपी देण्यात आली प्रेस कॉन्फरन्स संपताच पत्रकारांच्यात मानाने जाहिरात असल्याशिवाय कमर्शियल पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याची कुजबूत चालू होती,
यातून मात्र पत्रकारीतेची स्तर घसरल्याची दिसून येते होती.