Getting your Trinity Audio player ready...
|
मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क
पन्हाळा प्रतिनिधी/शहादुद्दीन मुजावर, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत पन्हाळा नगरपरिषदेस पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्फत पन्हाळा शहरातील विविध विकासकामांसाठी १.१७ कोटीचा निधी मंजूर झाले असल्याची माहिती पणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी दिली.
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ मधून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान (जिल्हास्तर) अंतर्गत प्रस्ताव सादर करणे बाबत जिल्हाधीकारी यांचे कडील सूचना पन्हाळा नगर परिषदेत प्राप्त झाल्या होत्या. त्यास अनुसरून पन्हाळा नगरपरिषद कडील विविध विभागाकडील व शहरातील नागरिकांच्या सूचनेनुसार कामांची यादी तयार होऊन त्याचे अंदाजपत्रक बनवून त्यास तांत्रिक मान्यता प्राप्त करून परिपूर्ण प्रस्ताव नगरपरिषद मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले गेले. माननीय पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्यामुळे पन्हाळा नगरपरिषदेस योजनानिहाय निधी मंजूर होऊन प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेल्या आहेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान (जिल्हास्तर) करिता र.रु १,१७,४९,२००/- रक्कमेचा निधी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना जिल्हा नियोजन समिती, कोल्हापूर यास होऊन पन्हाळा नगरपरिषदेस मंजूर झाला आहे. लवकरात लवकर नगरपरिषद मार्फत सदर योजनेतील मंजूर कामास सर्व प्रक्रिया पूर्ण करून कामास सुरवात केली जाईल असे मुख्याधिकारी श्री. चेतनकुमार माळी यांनी सांगितले.