Read Time:2 Minute, 33 Second
Media control news network
येथील विधीज्ञ ॲड. संदीप वसंतराव पवार यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ॲड. संदीप पवार यांनी आज पर्यंत अनेक सिविल व फौजदारी केसेस गेले 20 वर्षे हताळत अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.
संदीप पवार यांची खासियत म्हणजे समाजातील सामाजिक जाणीव ठेवून अनेकांना कायद्याविषयी मोफत सल्ला देत आले आहेत.
समाजातील उपेक्षित घटकांना गुन्हेगार बनु नका कायद्याचा सन्मान करा गुन्हा घडल्यानंतर केसेस दाखल होऊन अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे आपल्या कुटुंबियांना व मित्र परिवारांना नाहक त्रास होतो, तरुण वर्ग गुन्हेगारीकडे वळून गुन्हेगार बनत चालला आहे याकडे सर्वांनी गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे गुन्हे घडूच नये, गुन्हेगार तयारच होऊ नये. याकडे लक्ष वेधत अनेकांना मोफत सल्ला देत असतात.
भारत सरकार नोटरीपदी त्यांचे नियुक्ती झाल्याबद्दल अनेक उपेक्षित घटकांना त्याचा फायदा होणार आहे.
याबद्दल त्यांचा पत्रकार, मित्रपरिवार, हितचिंतक, पक्षकार आणि टुंबीयांच्याकडून अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत कायदे विषयक सल्लागार म्हणून पदावर कार्यरत आहेत.
या वेळी युवा पत्रकार संघाच्या वतीने
प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन ॲड. संदीप पवार यांची भारत सरकार नोटरी पदी नियुक्ती झाल्याबद्दल आपल्यासाठी आनंदाची बाब असून वकील साहेबांचे युवा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार समारंभाचा कार्यक्रम करण्याचा ठराव करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात आले.