Getting your Trinity Audio player ready...
|
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
एका प्रसिद्ध राजकारण्याचा बिनधास्त, निडर कार्यकारी तर एक भित्री भागुबाई पोलिस यांचं प्रेमाचं, लग्नाचं गणित जुळलं तर कसं वाटेल? कल्पना तरी होणं शक्य आहे का? अर्थात, नाही पण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने या जोडीची लग्नगाठ बांधली जाणार, अशी ही अनोखी, मनोरंजक कथा घेऊन ‘सन नेटवर्क’ची ‘सन मराठी’ वाहिनी ‘कॉन्स्टेबल मंजू’ ही नवीन मालिका १८ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मालिकेला प्रेक्षकांनी दिली दाद .
‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेच्या निमित्ताने साता-यामध्ये एक छोटाशा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात साता-यातील महिला कॉन्स्टेबल यांनी त्यांची विशेष उपस्थिती दर्शवली होती. ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेतील मंजू उर्फ अभिनेत्री मंजिरी वाघमारे हिच्या हस्ते उपस्थित सर्व कॉन्स्टेबल महिलांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांनी देखील त्यांचे अनुभव शेअर करताना सांगितले की सुरुवातीला त्यांचा देखील कॉन्स्टेबलचा प्रवास कसा होता, कशी त्यांना छोट्या-मोठ्या गोष्टींची भिती वाटायची, गोंधळ उडायचा. पण अनुभवाने त्या शिकत घेल्या, धीट होत गेल्या.
मंजिरी वाघमारे उर्फ मंजू ही तिच्या ‘वाघमारे’ या आडनावाप्रमाणे बिलकुल धाडसी नाही. मंजू ही भित्री जी जवळजवळ प्रत्येकाला आणि प्रत्येक गोष्टीला घाबरते. कोणीही मोठ्याने बोलताना ऐकल्यावर सुद्धा ती घाबरते आणि त्यामुळे तिच्याकडून चुका होतात.
पोलिस या पदाला शोभेल अशी धीट कामं करण्यापेक्षा स्टेपलरमध्ये स्टेपलर पिन टाकणे, फाईल्स लावणे, कागदपत्रे भरणे, ज्येष्ठांसाठी बाटलीत पाणी भरणे, देवाची पूजा करणे ही क्षुल्लक कामे ती पोलीस स्टेशनमध्ये एका दिवसात पार पाडते. पोलिस होण्याचा एकही गुण तिच्यात नाही. उलट, कोणताही गुन्हा घडूच नये, अशी ती देवाकडे प्रार्थना करते. खरंतर तिला पोलीस बनण्यात अजिबात रस नव्हता. पण परिस्थिती अशी होती की तिला नाईलाजास्तव पोलीस दलात भरती व्हावे लागले. ‘शी इज गुड फॉर नथिंग’, हेच तिला नेहमी घरात आणि पोलीस स्टेशनमध्ये बोलले जाते. त्यामुळे, मंजुला ही ती निरुपयोगी आहे असे वाटू लागले पण आत्मविश्वास गमावलेल्या मंजूच्या आयुष्यात अचानक हिरोची म्हणजेच सत्याची एन्ट्री होते.
आता भित्री मंजू आणि निडर सत्या लग्नाच्या बंधनात सामान्य वैवाहिक आयुष्य जगतील का? दोघांचं एकमेकांसोबत जमेल का? सत्याच्या सहवासात राहून मंजूच्या स्वभावात बदल घडून ती धाडसी होईल का? आत्मविश्वास गमावलेली मंजू या नव्या नात्यामुळे स्वतंत्र होऊन स्वतःची ओळख निर्माण करेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना या मालिकेतून नक्की मिळतील.
संदीप जाधव निर्मित ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेत मोनिका राठी हिने मंजुची आणि वैभव कदम यांनी सत्याची भूमिका साकारली आहे. या मालिकेचे संवाद तेजपाल वाघ यांनी लिहिले असून स्वप्नील गांगुर्डे यांनी कथा, पटकथा लिहिली आहे. भिन्न स्वभावाची ही अनोखी प्रेम कहाणी नक्की पाहा सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त सन मराठी वाहिनीवर.