सण व उत्सव साजरे करताना आचारसंहितेचे पालन करा – अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 28 Second

पन्हाळा प्रतिनिधी / शहादुद्दीन मुजावर

सध्याचा काळ हा निवडणूकीचा आहे त्यामुळे पन्हाळा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सर्वच गावात या कालावधीत यात्रा, आंबेडकर जयंती, गुढीपडावा, रमजान ईद यासारखे धार्मिक सण व सामाजिक उत्सव साजरे होणार आहेत.ते सण व उत्सव साजरे करत असताना आचारसंहितेचे काटेकोर पालन करा असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी केले. 

पन्हाळा येथे निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत बोलत होत्या.

पन्हाळा उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी सण, उत्सव साजरे करतेवेळी आचार संहितेचे भान ठेवा. विशेष करून यात्रेच्या वेळी लावले जाणारे ध्वनीक्षेपक, मनोरंजनाचे कार्यक्रमा साठी योग्यत्या परवानग्या घ्या. व   धार्मिक सर्वच कार्यक्रमासाठी असणारी बंधने काटेकोरपणे पाळा.हा लोकसभा निवडणूक 2024 आचारसंहितेचा कालावधी असल्याने यामध्ये होणारे गुन्ह्याची गंभीर दखल घेतली जाते,  त्यामुळे सर्वांनी या कालावधीत कोणताही गुन्हा दाखल होणार नाही याची दक्षता घ्यावी.  पन्हाळा परिसरात सर्वच धर्मातील लोक असल्याने समाजात असलेले ऐक्य येथे आदर्शवत आहे.त्यामुळे येथे कोणताही अनुचित प्रकार घडत नाही. हीच परंपरा या आचारसंहितेच्या कालावधीत कायम ठेवावी, असे आवाहन केले.

तर शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासाहेब पवार ,पन्हाळा पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, चंद्रकांत गवंडी, माजी पोलिस पाटील भीमराव काशीद, सर्व पोलिस पाटील, सरपंच व नागरिक उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *