तीन घटनांनी कोल्हापूर हादरले…!

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 31 Second

 

कोल्हापूर/अजय शिंगे : निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन अवघे काही दिवस झाले असता, कोल्हापूर शहरात आज दिवसभरात तीन धक्कादायक घटना घडल्या आहेत.
आज सकाळी सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मागे असलेल्या ओढ्यात एक शिर नसलेला मृतदेह सापडला.आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

नाल्याच्या सफाईचे काम सुरू असताना सफाई कर्मचाऱ्यांना हा मृतदेह दिसला. त्यांनी त्वरित पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे. ही बातमी ताजी असतानाच अचानक दुसरी घटना समोर आली.
कोल्हापूरच्या शनिवार पेठ परिसरातील एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तिच्या घरातील सदस्यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या शनिवार पेठ परिसरातील वैष्णवी लक्ष्मीकांत उर्फ बाळु पोवार या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तिच्या आईसह भावास ताब्यात घेतल्याचे समजते. वैष्णवीच्या मृत्यूचे करण अजून स्पष्ट झालेले नाही. या तरुणीच्या अंगावर मारहाणीचे वळ असल्याने तिचा घातपात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच वैष्णवी ही एका खासगी बँकेत नोकरी करत होती.
चार महिन्यापूर्वी तिचा साखरपुडा झालेला होता. काल तिला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते आज उपचार सुरू असताना तिने अखेरचा श्वास घेतला.या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली असतानाच सायंकाळच्या घटनेने पूर्ण शहर हादरून गेले..

कोल्हापुरातील रंकाळा चौपाटीवर एका तरुणाचा पाठलाग करून

6 ते 7 जणांनी तलवार कोयता येडका अशा धारधार हत्यारांनी निर्घृण खून केला. रंकाळा येथील गर्दीच्या ठिकाणी घडल्याने खळबळ उडाली आहे.

एखाद्या सिनेमाचा सिन असावा अशी भयानक घटना आज शहरातील गर्दीचं ठिकाण घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. चौपाटीवर नागरिकांच्या डोळ्यासमोर हा सशस्त्र हल्ला करण्यात आला अजय शिंदे असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून यादव नगरातील टोळी युद्धातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दिवसभरातील या तीन घटनांनी कोल्हापूर शहरातल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *