मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोल्हापुरात आज सायंकाळी चारच्या सुमारास तरुणाचा पाठलाग करुन निघृण खून केल्याची घटना घडली. रंकाळ परिसरात घडलेल्या या घटनेने कोल्हापूरात खळबळ उडाली आहे. दोन गटाच्या वादातून हा खून झाल्याची सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अजय दगडू शिंदे असे या मृत तरुणाचे नाव आहे. रंकाळा तलावाजवळ पाच तरुणांनी पाठलाग करत तलवारी, कोयत्यासह धार धार हत्याराने तरुणाचा हा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ला करणारे पसार झाले असल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली आहे.