कोल्हापूर : अन्न पदार्थाच्या बाबत कारवाई करू नये यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अन्न व औषध प्रशासन विभागातील महिला अधिकाऱ्यास शुक्रवारी लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले.
किर्ती धनाजी देशमुख असे कारवाई झालेल्या महिलेचे नाव आहे.
विभागाकडून मिळालेली माहिती अशी की सदर प्रकरणातील तक्रारदार यांचे किणी, ता. हातकणंगले येथे मे . सम्राट फुडस नावाचे रेस्टॉरंट आहे. १५ मार्च रोजी अन्न सुरक्षा अधिकारी किर्ती देशमुख यांनी सम्राट रेस्टॉरंटवर जाऊन तेथील अन्न पदार्थांची तपासणी करून अन्न पदार्थांचे काही नमुने घेतले होते त्यामध्ये दोष आढळून आले.या प्रकरणी कारवाई न करण्यासाठी आणि हे प्रकरण इथेच दाबण्यासाठी देशमुख हिने तक्रारदार यांच्याकडे १ लाख रुपये मागणी केली होती. शेवटी तडजोड करून ७० हजार रुपये घेण्याचे देण्याचे ठरले होते. याच पैशाचा पहिला हफ्ता रोख २५ हजार रुपये त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये स्वतः स्वीकारत असताना त्यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिली.