मोदींच्या सभेसाठी भव्य दिव्य तयारी मग देशाच्या चौथा स्तंभाला मात्र “ताकतुंबा इकडून तिकडे जा”…!

कोल्हापूर – तब्बल १० वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुर मध्ये येणार यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील प्रशासन संपूर्ण तयारीनिशी सज्ज झालेलं. तसंच कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या खास प्रचारासाठी कोल्हापुरात येत असल्याने कार्यकर्त्यांनी जंगी तयारी केली. प्रत्येक वेळेला डी आय वो, व प्रशासनाची जबाबदारी असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचीच गैरसोय नेहमीच केली जाते असाच अनुभव गेले दोन दिवस “ताकतुंबा इकडून तिकडे जा” म्हणी प्रमाणे सर्व प्रसार माध्यमातील पत्रकार बंधू-भगिनी पत्रकार सुरक्षा पाससाठी जिल्हा माहिती कार्यालय, एस पी ऑफिस, तदनंतर भाजपा कार्यालय, परत एस पी ऑफीस आधार कार्ड घेऊन हेलपाटे मारून पास मिळवल्यानंतर सभेच्या ठिकाणी अवमान कारक वागणूक देऊन कोणतीच पत्रकारांच्या साठी व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आल्या नंतर मात्र स्वाभिमानी पत्रकारांनी सभेच्या ठिकाणीच खाली बसून निषेध व्यक्त केला.
तपोवन मैदानावर मोदींच्या सभेसाठी भव्य दिव्य अशी तयारी करता येवू शकते तर मग देशाच्या चौथा स्तंभाला साधी बसण्याची व्यवस्था न केल्यानं पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.पत्रकार ही मतदार आहेत हे संयोजकांना लक्षात यायला पाहिजे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *