Share Now
Read Time:3 Minute, 11 Second
Media control news network
सन २०१६ मध्ये आरोपी विवेक विश्वास गोरे याने मैत्रीचे संबंधातून वैभव पसारे यांचेकडून रक्कम रु.२,००,०००/- हात उसणे घेतले होते. ती रक्कम परत देणेस टाळाटाळ करीत असलेने फिर्यादींनी आरोपीवर एन. आय. ॲक्ट कलम १३८ पमाणे चेक बाउन्सची एस.सी.सी. केस नं.७०९/२०१६ दाखल केली होती. सदर केसमध्ये फिर्यादी यांनी ३ साक्षीदार तपासले तर आरोपी तर्फे बचाव पुरावा म्हणून २ साक्षीदार तपासले. मा. न्यायाधिशसाो यांनी फिर्यादी तर्फे व आरोपी तर्फे दिलेले पुरावे पाहून आरोपीने दिलेले खोटे पुरावे व विसंगती पाहून आरोपीस २ महिन्याचे कारावासाची शिक्षा दिली..
हकीकत अशी –
फिर्यादी वैभव नाना पसारे यांचा राजारामपुरी येथे व्यवसाय आहे. आरोपी विवेक विश्वास गोरे हा तिथेच राहत असलयाने त्यांचे मैत्रीचे संबंध होते. या संबंधातून अआरोपीने फिर्यादी यांच्या कडे रक्कम त्याच्या अडचणी साठी व त्याचे वडील मयत झालयाने कोर्टामधून वारसा दाखला घेण्यासाठी आरोपीच्या मागणीनुसार फिर्यादिने रक्कम दिली होती. परंतु, आरोपी हा त्याचे पैसे मिळून देखील फिर्यादी त्यांचे पैसे देत नव्हता व टाळाटाळ करत होता शेवटी आरोपीने दिलेला चेक बँकेत न वटल्याने फिर्यादीने jmfc कोल्हापूर येथे केस दाखल केली. व लवकर केस मध्ये योग्य तो पुरावा दिल्याने
मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीसाो (४ थे) कोल्हापूर यांनी फिर्यादी तर्फे दिलेला पुरावा ग्राहय धरुन आरोपी विवेक विश्वास गोरे यास २ महिने कारावास व नुकसान भरपाई म्हणून रु.२,८०,०००/- इतकी नुकसान भरपाई एक महिन्याच्या आत देणेबाबत आदेश करुन आरोपीस खोटा चेक देऊन फसवणूक केलेलाबात शिक्षा दिली.
फिर्यादीचे वतीने ॲड. संदिप वसंतराव पवार यांनी काम पाहीले. ॲड. संदीप पवार यांची नुकतीच भारत सरकार नोटरीपदी निवड झाली असून अनेक संस्थेवर कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना वरील केस मध्ये ॲड. रसिका रजपूत यांनी सहाय्य केले व फिर्यादीस न्याय मिळवून दिला.
Happy
0
0 %
Sad
0
0 %
Excited
0
0 %
Sleepy
0
0 %
Angry
0
0 %
Surprise
0
0 %
Share Now