Share Now
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्याही दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. कागल तालुक्यात जोरदार ढगफुटी सदृश पावसामुळे आंबेओहोळ ओढ्याला पूर आला. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जोरदार पावसाने हजेरी लावली असून कोल्हापूर रेड अलर्ट वर असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. शहरात दुपारी कडक उकाडा जाणवत होता सायंकाळी पावसाने काही काळातच शहरवासीयांना भिजवून सोडले. इचलकरंजी मध्ये देखील मुसळधार पावसामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गगनबावडा,शाहूवाडी, करवीर, हातकणंगले तालुक्यात जोरदार पावसाची सुरूवात झाली आहे.कागल तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे अनेक ठिकाणी गडहिंग्लज रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक खंडित झाली आहे. सेनापती कापशी, हणभरवाडी ,बेरडवाडी येथे एकसारखा पाऊस सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे माहिती मिळाली आहे.मुसळधार पावसामुळे शेतात,ओढ्यांत अडकलेल्या माणसांना बाहेर काढण्याचा काम सुरू होते.
Share Now