Share Now
कोल्हापूर : पासिंग दंड रद्द करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समिती कडून विराट मोर्चा काढण्यात आला आहे. आमची प्रमुख मागणी हीच आहे कि आमच्यावर लावलेला दंड रद्द करावा अन्यथा आम्ही चक्का जाम आंदोलन करू असा इशारा यावेळी वाहनधारक समिती कडून देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आर्थिक शोषण करण्याचे काम भांडवलदारी कंपन्या करत आहे आणि त्यांची पाठराखण महाराष्ट्र सरकार करत आहे त्यामुळे आम्ही जगावं कि मरावं एवढंच त्यांनी आम्हाला सांगावं अशा भावना देखील चालकांनि यावेळी व्यक्त केल्या. रिक्षा पासिंग करण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रूपये इतका दंड आकारण्यास परिवहन कार्यालयाने सुरुवात केली आहे. या निर्णयाला राज्यभरातून विरोध होताना दिसत आहे.याच संदर्भात पासिंग दंड रद्द करावा या मागणीसाठी कोल्हापुरातील दसरा चौकातून हा मोर्चा काढण्यात आला आहे
Share Now